Headlines

Sharad Pawar : “महाराष्ट्र स्थिर असतो तेव्हा शरद पवार हे जातींमध्ये वाद लावण्याचं काम करतात”; कोणी केली टीका? – former mp ramdas tadas criticized sharad pawar for creating disputes among castes


Sharad Pawar News : जातीमध्ये वाद घालण्याचे काम शरद पवार हे करतात, जेव्हा निवडणूक येते तेव्हा अशी आंदोलने केली जातात, असा आरोप माजी खासदाराने केला आहे. जनगणनेवर आधारित आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणीही खासदाराने केली.

Sharad Pawar
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा दिसरा दिवस सुरू आहे. आंदोलन आता तीव्र होत असून आंदोलकांची संख्या वाढताना दिसत आहे. या आंदोलनाला सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार आणि खासदारांनी उपस्थिती लावली. अशातच यावरून महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष तथा माजी खासदार रामदास तडस यांनी पवारांवर निशाणा साधला.

मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही पण ओबीसीमधून आरक्षण देण्यात येऊ नये अशी ठाम भूमिका महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष तथा माजी खासदार रामदास तडस यांनी मांडली आहे. मराठा समाजाने मुंबईत आंदोलन सुरू केले. ज्या ज्यावेळी निवडणुका येतात त्या त्या वेळी हे आंदोलन केलं जाते. विशेष म्हणजे महाराष्ट्रात तसेच देशात ओबीसी समाजाची संख्या अधिक आहे. त्यामुळे जनगणनेवर आधारित आरक्षण दिले गेले पाहिजे. महाराष्ट्र ज्यावेळी स्थिर राहतो, त्यावेळी जाती जातीत झगडे लावण्याचे काम पवार साहेब करतात. पवार साहेबांची आता सत्ता नाही आणि येणारही नाही. जेव्हा निवडणुका येते तेव्हा आंदोलन केले जाते असा आरोप देखील रामदास तडस यांनी केला आहे. वर्ध्यात माध्यमाना प्रतिक्रिया देताना रामदास तडस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Maharashtra Timesआझाद मैदानावर तुफान गोंधळ, सुप्रिया सुळे यांची गाडी अडवली, घेराव घातला, आंदोलक आक्रमक
मराठ्यांना वेगळे आरक्षण द्यावे, पण ओबीसी मधून आरक्षण देऊ नये, सरकारने जे काही धोरण करायचे असेल ते वेगळे आरक्षण धोरण करावे.. पण ओबीसीच्या ताटातून देणे संयुक्तिक नाही. कारण या देशात ओबीसी समाज सत्तर टक्के आहे आणि 352 जाती आहे. त्यामुळे ओबीसीला आणखी बारा टक्के आरक्षण वाढवून द्यावे तरच ओबीसी समाजाला न्याय मिळेल. पवार साहेबांनी काल असे म्हटलं होतं की तामिळनाडू मध्ये आरक्षण दिलं गेलं आणि कोर्टात ते टिकलं. महाराष्ट्र सरकारला केंद्राची मान्यता घ्यावी लागते. मी तर त्याही पलीकडे जाऊन सांगतो की जातीय जनगणनेच्या आधारावर आरक्षण द्यावं. आम्हाला आताच तर कमी आरक्षण आहे ओबीसीला. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण द्यावं, पण ओबीसी मधून देऊ नये. जर तसे झाले तर ओबीसी समाजाचा लढा मोठा राहिल. नागपूर येथे ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. त्याला माझा पाठिंबा आहे. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची मागणी होती की, जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, त्याला सुरुवात झाली आहे. कोणाची संख्या किती हे लवकरच कळणार आहे. कोणाला कीती आरक्षण दिले गेले पाहिजे हे देखील त्यातून कळणार आहे. असे यावेळी माजी खासदार तडस यांनी म्हटले आहे.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा