Headlines

Hingoli Bike And Car Accident Husband Wife Died Daughter Injured;प्रचंड वेग अन् क्षणात कुटुंब उद्ध्वस्त, पती-पत्नीचा जागीच मृत्यू, तर लेक… हिंगोली हळहळलं


गजानन पवार, हिंगोली: औंढा नागनाथ ते वसमत जाणाऱ्या मुख्य मार्गावर औंढा नागनाथ तालुक्यातील काठोडा तांडा जवळ सोमवारी (6 ऑक्टोबर) रोजी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले. तर, दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वसमतकडून औंढा नागनाथच्या दिशेने येणारी कार (क्र. एमएच-12-एनई-3803) आणि औंढा नागनाथवरून अर्धापूरकडे जात असलेली दुचाकी (क्र. एमएच-26-झेड-2007) यांच्यात काठोडा-चोंडी परिसरात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघाताची तीव्रता इतकी होती की दुचाकीवरील दोघे पती-पत्नी जागीच ठार झाले. लहान मुलगी गंभीर जखमी झाली आहे तर कारमधील एकजण जखमी झाला आहे.
Maharashtra TimesJalgaon Crime: घरासमोरच दोघांकडून वार, रुग्णालयात नेलं पण.., कुटुंबाच्या डोळ्यादेखत तरुणाने प्राण सोडले, जळगाव सुन्न
अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे शेख एजाज शेख रहीम (वय 28 वर्षे) आणि त्यांची पत्नी नूरजहाँ बेगम शेख एजाज (वय 26 वर्षे, रा.अर्धापूर) अशी आहेत. दोघेही आपल्या दुचाकीने औंढा नागनाथवरून अर्धापूरच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची मुलगी अनाबिया बेगम शेख एजाज गंभीर जखमी झाली असून तिला तत्काळ औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

कारमधील प्रवासी देखील जखमी झाले असून त्यांना देखील प्राथमिक उपचारांनंतर पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी. एस. राहीरे, पोलीस उपनिरीक्षक दत्ता कानगुले, उपनिरीक्षक शेख खुदूस, जमादार रविकांत हरकळ, जमादार गजानन गिरी, वसीम पठाण व इकबाल शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनांचा पंचनामा करण्यात आला असून मृतदेह औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आले आहेत.

अपघाताचे नेमके कारण अद्याप समजले नसले तरी प्राथमिक माहितीनुसार, वाहनांचा वेग आणि रस्त्यावरची अंधाराची वेळ ही कारणे अपघातास कारणीभूत ठरल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे. या भीषण अपघातात एका तरुण दाम्पत्याचा करुण अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर विकास उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत.गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहे. राष्ट्रीय, गुन्हेगारी, राजकीय, हटके स्टोरीज या विषयांचं लिखाण करण्यात हातखंडा आहे. घटनेचं विश्लेषणात्मक लिखाण करण्यात रस. गेल्या 9 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून यापूर्वी टीव्ही ९ मराठी, साममध्ये कामाचा अनुभव आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचं शिक्षण घेतलं आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत