Headlines

Washim Police Station Youth was Killed after Filing a Complaint; ‘छेडछाडीची तक्रार का दिली?’, बेदम मारहाण करत तरुणाला संपवलं; ‘माझा भाऊ परत आणून द्या’ म्हणत कुटुंबाचा आक्रोश


Washim Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. त्याचदरम्यान, वाशिममध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस ठाण्यात तक्रार केल्यामुळे एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे.

Washim Crime News
पोलीस ठाण्यात तक्रार तरुणाची हत्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पंकज गाडेकर, वाशिम : दिवाळी पाडव्याच्या दिवशी वाशिम जिल्ह्यातील आमखेड गावात गैरकायद्याची मंडळी जमवून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. ‘पोलीस ठाण्यात छेडछाडीची तक्रार का दिली?’ म्हणत दोन गटात झालेल्या वादात एका व्यक्तीचा मृत्यू तर तीन जण जखमी झाले आहेत. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी फुलायंती नेमीचंद चव्हाण (वय 52) यांनी जऊळका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून फुलायंती यांच्या सवतीची मुलगी रंगीलानं छेडछाडीची तक्रार पोलिसांत का दिली? या कारणावरून आरोपी दादाराव पवार याने त्याच्या साथीदारांच्या मदतीनं जीव घेण्याच्या उद्देशाने चाकू आणि दगडाने मारहाण केली. यात फिर्यादी फुलायंती हिचा मुलगा अविनाश हा गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला तर पती, दुसरा मुलगा आणि सून गंभीर जखमी झाले.

आरोपींनी मारहाण करून स्वतःच्या दोन दुचाकी घटनास्थळी सोडून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच जऊळका पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करून जखमींना उपचार्थ वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. स्वाती चव्हाण, संदेश नेमीचंद चव्हाण, नेमीचंद चव्हाण असं जखमींचे नाव असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोनी शेळके, एस.डी.पी.ओ पाडवी, अप्पर पोलीस अधिक्षक यांनी भेट देऊन जलद गतीने आरोपी पकडण्याच्या सूचना दिल्या.

Maharashtra TimesMumbai Fire News : मुंबईच्या जोगेश्वरीमधील JNS बिझनेस पार्क बिल्डिंगमध्ये भीषण आग; अनेक मजले भक्ष्यस्थानी, परिसरात भीतीचं वातावरण

घटनेतील आरोपी राजु रामचंद्र पवार (रा. गिव्हा कुटे), दादाराव गंभीर पवार (रा. वाघी बु.), पवन गजानन चव्हाण (रा. बोराळा धनगर), अजय गजानन चव्हाण (रा. बोराळा धनगर), अशोक रामचंद्र पद्मार (रा. वाघी बु.) यांच्या विरुद्ध अप. नं. कलम 272/25 कलम 103,109,189(2), 191(2) 191(3), 190 BNS BNS जुनी कलम 302, 307, 143, 147, 148, 149 भादंवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध जऊळका पोलीस करत आहेत. ऐन दिवाळी सणात ही घटना घडल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Maharashtra Timesवडिलांसमोर खेळणाऱ्या साहिलला उचललं; 1 वर्षीय बालकाच्या अपहरणाने सांगलीत खळबळ, 48 तासांनंतर…

दिवाळीच्या सणातच कोल्हापूर हादरले

कोल्हापुरातील जयसिंगपूरमध्ये दीपावलीच्या रात्री घडलेल्या थरारक खुनाच्या घटनेमुळे परिसर हादरून गेला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. सुनील किसन पाथरवट (वय 32) या तरुणाचा पूर्व वैमान्यातून झालेल्या वादाच्या शेवटी धारदार चाकूने वार करून खून करण्यात आला होता. यापैकी काही संशयितांचा शोध सुरू असून पुढील तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा