Headlines

मुंबईत सातही धरणांमधील पाणीसाठा ७ टक्क्यांवर, वैतरणा-तानसा जवळजवळ रिकामे; जुलैमधील पावसामुळे दिलासा मिळणार?| Maharashtra Times


Mumbai Water Levels: जून महिन्यात मुंबईमध्ये मान्सूनपूर्व पावसाचं प्रमाण कमी होतं. मान्सून दाखल झाल्यानंतरही पावसाने एक दिवस कोसळून विश्रांती घेतली. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाली आहे.

मुंबई धरणात पाणीसाठा
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: मुंबईत २३ जून रोजी मान्सून दाखल झाला. त्यानंतर ४८ तास शहराला पावसाने झोडपलं पण त्यानंतर पुन्हा काही दिवस मुंबईत पावसाने पुन्हा विश्रांती घेतली आणि २८ जूनपासून पुनरागमन झालं. पण संपूर्ण जून महिना शहरात पुरेसा पाऊसचं झाला नाही. देशात हा १४६ वर्षांमधील सर्वात कोरडा जून महिना होता. त्यामुळे मुंबईतील धरणांमधील पाणीसाठा चक्क ७ टक्क्यांवर आला आहे. मुंबई महापालिकेने याबद्दल अधिकृत माहिती दिली आहे.

किती पाणी शिल्लक?

शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्यानुसार सातही धरणांमध्ये एकूण १ लाख २७९ दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरणांमध्ये १४.४७ दशलक्ष लीटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. अप्पर वैतरणा,मध्य वैतरणा, भातसा, तानसा, मोडक सागर, तुळशी आणि विहार हे सर्व धरण पाण्यासाठी मोसमी पावसावर अवलंबून असतात.

Maharashtra TimesMaharashtra Weather: पावसाचा जोर वाढणार, २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोकण ते विदर्भ कुठे किती बरसणार? IMDचा अंदाज समोर

अप्पर वैतरणामध्ये वापरण्यायोग्य पाणी उरलचं नाही हे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार शून्य टक्के वापरण्यायोग्य पाणी उपलब्ध आहे. मोडक सागरमध्ये क्षमतेपेक्षा १८.४७ टक्के पाणीसाठा होता, तानसा धरणही जवळजवळ रिकामा झालं आहे. मध्य वैतरणामध्ये क्षमतेपेक्षा ११.५३ टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. भातसामधील एकूण साठा ६ टक्क्यांहूनही खाली आहे. विहार धरणात पाणीसाठ्यात काहीशी वाढ दिसून आली असून पाणीसाठी ४५.१३ टक्क्यावर आहे. तुळशी धरणातही वाढ नोंदली गेली असून पाणीसाठा २४.२६ टक्क्यांवर होता. गेल्या २४ तासांपासून सुरू झालेल्या पावसामुळे विहार आणि तुळशीमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पण इतर धरणांतील पाण्याची पातळी घसरल्यामुळे पाणीसाठी ७.०८ टक्क्यांवरून थेट ६.९३ टक्क्यांवर पोहोचला.

पावसामुळे फायदा होणार का?

येत्या काही दिवसांमध्ये मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. २ जुलैपर्यंत शहरात यलो अलर्ट देण्यात आला असून वादळी वाऱ्यांसह पाऊस बरसणार आहे. २९ जून रोजी राज्यात सर्वत्र यलो अलर्ट देण्यात आला असून त्यामुळे पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे. जुलैच्या पावसाकडे आता मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे. २०२६ च्या तुलनेत २०२४ मध्ये पाणीसाठा आणखी कमी झाला होता. जूनच्या अखेरीस २०२४ मध्ये पाणीसाठा ५.४३ टक्क्यांवर पोहोचला होता. धरणांमध्ये ७८,५७९ दशलक्ष लीटर पाणी होतं. पण २०२५ च्या तुलनेत यंदा पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा