Headlines

Washim Chaitraban Dhaba Two Bikes Collide Husband Wife and One Dies on the Spot; भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक, पती-पत्नीसह एकाचा जागीच अंत; वाहनांचा अक्षरश: चक्काचूर


Washim Accident : राज्यात अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच वाशिममध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पती पत्नीसह एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Washim Accident
वाशिम चैत्रबन ढाबा बाईक्स अपघात(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पंकज गाडेकर, वाशिम : वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर – संभाजीनगर महामार्गावरील जऊळका गावातील चैत्रबन ढाब्याजवळ आज गुरुवारी रोजी दुपारच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक झाली. या भीषण अपघातात पती पत्नी आणि एका युवकाचा अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किसन नंदू भोकरे (वय 20, रा. सावरखेड ता. पातूर, जि. अकोला), सदाशिव राठोड आणि सरलाबाई सदाशिव राठोड (दोघे रा. मंगरूळपीर, ता. जि. वाशिम) या पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर किसन भोकरे यांच्या दुचाकीवरील साथीदार राजू लठाड (वय 27, रा. कोळदरा) हे गंभीर जखमी झाले आहेत.

मृतक किसन भोकरे व त्याचा सहकारी दुचाकी क्रमांक एम.एच 30 बीजे 5445 गाडी घेऊन अकोला जिल्ह्यातील सावरखेड येथून शेलूबाजारकडे जात होते. समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक एमएच 37 एएल 5479 यावर सदाशिव राठोड व त्यांच्या पत्नी सरलाबाई राठोड मंगरूळपीरवरुन मुंबईकडे जात असताना जऊळका येथील चैत्रबन ढाब्याजवळ या दोन्ही दुचाकींची समोरासमोर जबर धडक झाली, आणि भीषण अपघात झाला. या अपघातानंतर अपघातग्रस्त वाहनधारक रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

Maharashtra TimesRaigad News: शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, बड्या नेत्याला एका जुन्या प्रकरणात न्यायालयाकडून सात वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा

रस्त्याने जाणाऱ्या काही प्रवाशांनी अपघाताची माहिती जऊळका पोलिसांना कळविताच जऊळका पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेतून दवाखान्यात दाखल केलं. यावेळी डॉक्टरांनी तपासणी केली असता तिघांना मृत घोषित केले तर एकावर गंभीर जखमीवर तात्काळ उपचार सुरू केले आहेत. या अपघातात पती पत्नीचा आणि एका 20 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून पुढील तपास जऊळका पोलीस करत आहे.

Maharashtra Times‘बॉसला कानशिलात मारा आणि…, मी सुद्धा लोकलने येणार’, राज ठाकरे यांची घोषणा, 1 तारखेच्या मोर्चावर काय-काय म्हणाले?

लेकराच्या तोंडून शेवटचे शब्द ऐकले

जळगाव जिल्ह्यातील अडावदमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. वडिलांना मदत करुन ‘जेवणासाठी घरी जातो’, असं सांगून गेलेला लेक पुन्हा घरी परतलाच नाही. घरी जातान वाटेतच टरबूजने भरलेल्या भरधाव ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर ट्रकच्या चाकाखाली आल्यानं 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. आकाश ज्ञानेश्वर पाटील (वय 21) असं मृत तरुणाचं नाव आहे. ही घटना चोपडा तालुक्यातील अडावदमध्ये घडली असून आकाशचा मृतदेह बघितल्यानंतर आई-वडिलांसह कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा