Headlines

mp pratibha dhanorkar big statement own party enemies conspired against me ; मला ‘व्हिलन’ ठरवलं, एक दिवस सत्य सांगणार; खासदार प्रतिभा धानोरकरांचा सूचक इशारा


Pratibha Dhanorkar: मला व्हिलन ठरवण्यात आले, वेळ आल्यावर सगळं सांगेन. असा सूचक इशारा प्रतिभा धानोकरकांनी दिला आहे.

pratibha dhanorkar
प्रतिभा धानोरकर(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.वृत्तसेवा, चंद्रपूर: राज्यात काँग्रेसची स्थिती बिकट असताना चंद्रपूरच्या जनतेने पक्षावर विश्वास टाकला. सत्ता स्थापन करताना काही ‘सेक्युलर’ म्हणवणाऱ्या पक्षांनी आणि आपल्याच काही हितशत्रूंनी माझ्याविरोधात कट रचला. मला या संपूर्ण प्रकरणात व्हिलन ठरवण्यात आले असले, तरी वेळ आल्यावर मी माझी आपबीती जनतेसमोर नक्कीच मांडणार असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

चंद्रपूर येथे खासदार धानोरकर यांच्या पुढाकारातून काँग्रेस व मित्र पक्षाच्या नवनिर्वाचित तसेच पराभूत उमेदवारांचा स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा अॅड. कुंदा जेनेकर, शहराध्यक्ष संतोष लहामगे, विनोद दत्तात्रय, सुभाष गौर, जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख, नगरसेवक वसंता देशमुख यांच्यासह बहुसंख्येने नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Maharashtra TimesAvinash Warjurkar : माजी आमदाराचा काँग्रेसला रामराम, मुंबईत फडणवीसांची भेट, भाजपचा झेंडा हाती धरणार
खासदार धानोरकर म्हणाल्या, महापौर आपलाच असावा किंवा आपण प्रबळ विरोधी पक्षात बसावे, अशा काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्या स्पष्ट सूचना होत्या. पक्ष वाढविण्यासाठी नेते प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. मात्र काही स्वार्थी कार्यकर्ते स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्या नेत्यांच्या विरोधात कानभरणी करून गटबाजी निर्माण करतात. अशा प्रवृत्तींमुळेच पक्षाच्या हक्काच्या संधी हुकतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरमध्ये नायजेरियन तरुणांवर महिलेशी गैरवर्तनाचा आरोप, जमावाकडून चोप
खासदारांमुळेच वाढले नगरसेवक

जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. ते म्हणाले, खासदारांच्या प्रभावी पुढाकारामुळेच काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या १२वरून २७पर्यंत पोहोचली आहे. भविष्यातही आम्ही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम करू असेही त्यांनी नमूद केले

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा