Headlines

China Renminbi Currency; डॉलरच्या साम्राज्याला चीन सुरूंग लावणार, भारताचा शेजारी अमेरिकेच्या मुळावर वार करणार? बीजिंगच्या खेळीने जागतिक समीकरणं बदलणार


US vs China Currency War: चीनच्या एका पावलाने जगभरातील प्रमुख गुंतवणूकदार, बँका आणि सरकारांचे लक्ष वेधून घेतले आहे. वरवर चीनची नवीन खेळी केवळ वित्तीय क्षेत्रापुरती मर्यादित वाटू शकते, पण यामागंच कारण खूप व्यापक आहे. आता प्रश्न केवळ नाही, तर जगातील बदलत्या सत्ता संतुलनाचा आहे.

चीनमध्ये दरवर्षी जून महिन्यात शांघाय येथे Lujiazui Forum आयोजित केली जाते, जी भारताच्या शेजारील देशाची सर्वात मोठी आर्थिक धोरण परिषद मानली जाते. जागतिक दावोसमध्ये ज्याप्रमाणे जागतिक लीडर आणि व्यावसायिक नेते जागतिक अर्थव्यवस्थेवर चर्चा करतात, त्याचप्रमाणे चीन येत्या काही वर्षांसाठी आपली आर्थिक रणनीती आखण्यासाठी फोरमच्या व्यासपीठाचा वापर करतो.
Maharashtra Timesपगारातून TDS कापला पण भरला नाही, आयकर विभागाने दिली 3.36 लाखांची नोटीस; मुंबईतील IT प्रोफेशनलसोबत काय घडलं?

चीनचा करन्सी बाजारात नवीन डाव

यंदाही परिषदेत अनेक मोठ्या घोषणा केल्या गेल्या असून चीनने आपल्या ऑफशोअर Renminbi या चलनाच्या आंतरराष्ट्रीय वापराला प्रोत्साहन देण्याचे जाहीर केले. चीनच्या या नव्या खेळीमुळे परदेशातील मध्यवर्ती बँका आणि मोठ्या गुंतवणूकदारांसाठी नवीन तरलता सुविधा निर्माण केल्या जातील व सीमापार Renminbi व्यापार अधिक सुलभ केला जाईल. यासोबतच चीनच्या फायनान्शिअल क्षेत्राचा काही भाग देखील परदेशी गुंतवणुकीसाठी अधिक खुला होईल.

चिनी खेळीचा अमेरिकी डॉलरवर काय परिणाम होणार?
तेल खरेदी असो, इतर देशांना पैसे देणे असो किंवा परकीय चलन साठा राखणे असो, बहुतेक आंतरराष्ट्रीय व्यापार अमेरिकन डॉलरमध्ये होतात. अमेरिकी चलनाचे वर्चस्व सगळीकडे पाहायला मिळते ज्याचा या महा-अर्थसत्तेला भरमसाठ फायदा होतो. एखाद्या देशावर आर्थिक निर्बंध लादायचे असतील, तर अमेरिकेकडे डॉलरअस्त्र आहे. तसेच एखाद्या देशाला डॉलर-आधारित पेमेंट प्रणालीतून वगळल्यास त्या देशाला आंतरराष्ट्रीय व्यापार करणे अत्यंत कठीण होऊ शकते.
Maharashtra TimesStock Market: आशियाई बाजारात विक्रीचं तुफान! भारत पुन्हा टॉप 5 मध्ये; तैवान, कोरियन मार्केट कोसळले; नेमका विषय काय?
म्हणून डॉलरला केवळ एक चलन नाही तर, सामरिक शक्ती मानले जाते ज्याला चीन गेल्या 20 वर्षांपासून आव्हान देऊन बदलण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत आहे. पण उल्लेखनीय गोष्ट म्हणजे की पूर्णपणे अमेरिकी डॉलरला पदच्युत करणे चीनचा उद्देश असेलच असे नाही.

चीनचा ध्येय वेगळाच आहे

चीन एक अशी प्रणाली तयार करत आहे ज्यामध्ये जगातील इतर देशांना डॉलरसमोर पर्याय मिळेल. म्हणजे कोणताही देश, शक्य असल्यास चिनी renminbi चलनात व्यवसाय करू शकतो, गुंतवणूक आणि देयके स्वीकारू शकतो. म्हणूनच डॉलरची जागा घेण्याऐवजी त्यावरील अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने धोरण अवलंबत असल्याचे अनेक तज्ञांचे म्हणणे आहे.
Maharashtra TimesUS Iran Tension: होर्मुझची सामुद्रधुनी पेटली, इराण-अमेरिका पुन्हा भिडले; तेलाच्या किमतीत अचानक खळबळ, आता पुन्हा महागाईची भडका!
मात्र, चीनचा हा खेळ नवीन नाही. 2008 च्या जागतिक आर्थिक संकटानंतर चीनने पॉलिसी बदलली आणि रेनमिनबीमध्ये व्यवहाराचे नियोजन सुरू केलेले. मात्र, इतक्या वर्षांनंतरही चीन अमेरिकी चलनाची बरोबरी करू शकलेला नाही. पण चीनचे धोरण नेहमीच दीर्घकालीन असून एका झटक्यात ध्येय गाठण्याऐवजी आहिस्ता-आहिस्ता कूच करत आहे.

याच कारणामुळे यंदा यावेळी Lujiazui Forum मध्ये केलेली घोषणा केवळ परिषदेतील घोषणा नसून चीनच्या दीर्घकालीन आर्थिक धोरणाचा पुढचा टप्पा मानला जात आहे. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदार यंदा चीनच्या धोरणाकडे पूर्वीपेक्षा अधिक गांभीर्याने पाहत आहेत.

चीनच्या नव्या आर्थिक धोरणेचे महत्तव काय
डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात जगभर अमेरिकेच्या धोरणांचा विरोध केला जात असताना चीन जागतिक आर्थिक व्यवस्थेत आपली भूमिका वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचं या धोरणावरून दिसून येते. पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की चिनी चलन, रेनमिनबी, लवकरच अमेरिकन डॉलरची जागा घेईल असा कोणताही दावा केला जात नाही आहे, पण यामागे मोठा खेळ दडला आहे.

अशा परिस्थितीत, अमेरिकेपुढील सर्वात मोठा प्रश्न हा आहे की महासत्ता वेळेत या बदलत्या वातावरणाशी जुळवून घेऊ शकेल का? आणि अशा जागतिक आर्थिक प्रणालीकडे उर्वरित जग वाटचाल करेल का? जिथे केवळ एकच चलन नव्हे तर अनेक पर्याय उपलब्ध असतील.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत