Headlines

सी लिंक, बोगदा आणि कनेक्टरसह बांधणार ‘मुंबई-वाढवण एक्सप्रेसवे’; MMRDAकडून भूसंपादनाला सुरुवात| Maharashtra Times


Uttan-Virar Sea Link Project: वाढवण बंदर आणि प्रस्तावित विमानतळाला मुंबईशी जोडण्यासाठी मुंबई-वाढवण कनेक्टिव्हीटी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सी लिंकचा विकास होणार आहे. त्यासाठी MMRDAने भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात केली आहे.

उत्तन विरार सी लिंक
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पालघर: उत्तन-विरार सी लिंक प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पासाठी तब्बल ५८,७५४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एमएमआरडीएने उत्तन गावातील जमीन मालकांना 15 दिवसांची नोटीस बजावली आहे. यादरम्यान नागरिक स्वेच्छेने त्यांची जमीन हस्तांरित करू शकतील.

कसा होणार फायदा?

सी-लिंक प्रकल्पासाठी १०४.२८५१ हेक्टर जमीनीची गरज आहे. या मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार असून नुकताच तो राज्य सरकारने मंजूर केला आहे. प्रस्तावित वाढवण बंदर आणि विमानतळापर्यंत कनेक्टिव्हीटी वाढवण्यासाठी हा मार्ग गरजेचा आहे. त्यामुळे भविष्यात उत्तन-विरार सी लिंकला ‘मुंबई-वाढवण एक्सप्रेसवे कनेक्टिव्हिटी‘ हे नाव देण्यात येणार आहे.

एमएमआरडीएचे अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि उपनमहानगर आयुक्त अजिंक्य पडवळ यांनी या भूसंपादनाची नोटीस जारी केली आहे. यानुसार महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना (MRTP) अधिनियम, १९६६, चे कलम १२६(१) (अ )आणि (बी) अंतर्गत हे भूंसपादन केलं जात आहे. या कायद्याअंतर्गत, जमीनमालक अधिकाऱ्यांशी बोलून मोबदल्याच्या रकमेसाठी वाटाघाटी करू शकतात किंवा FSI आणि TDR अंतर्गत मोबदला मिळवू शकतात.

Maharashtra TimesPalghar Offshore Airport: महामुंबईतील तिसरं विमानतळ, देशात पहिल्यांदाच समुद्रात उभारणार; कुठे-कसा असेल प्रकल्प?

सी लिंकसाठी राज्य सरकारकडून ११,११६.२७ कोटी रुपयांचं बिनव्याजी आर्थिक सहाय्य केलं जाणार आहे. या रकमेत केंद्र आणि राज्य सरकारला भूसंपादनासाठी २,६१९ कोटी रुपयांचा देय कर आणि पुनर्वसनासाठी २६१ कोटी रुपयांचा समावेश आहे. उर्वरित रक्कम एमएमआरडीएचे अंतर्गत साधनं आणि कर्जाद्वारे मिळणार आहे.

भूसंपादनाला सुरुवात

७/१२ वर नावं असलेल्या जमीनमालक, रहिवासी, भाडेकरू आणि इतर नागरिकांना येत्या १५ दिवसांमध्ये लेखी स्वरुपात आपली संमती दर्शवण्याचे निर्देश दिले आहेत. वांद्रे पूर्व येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन हे करू शकतात. पण दिलेल्या कालावधीत संमती नाही मिळाली तर सक्तीचे भूसंपादन केलं जाईल असा इशारा देण्यात आला आहे. या मार्गासाठी लागणारी सरकारी जमीन एमएमआरडीएला मोफत दिली जाईल. त्याशिवाय अॅक्सेस-कंट्रोल्ड टोल, जाहिरातींद्वारे महसूल गोळा केला जाणार आहे.

उत्तन विरार सी लिंक (MMRDA)

कसा असेल मार्ग?

मुंबई-वाढवण एक्सप्रसेवेचा मार्ग १२० किमी लांब असेल. या सागरी मार्गाद्वारे दक्षिण मुंबईला पालघर जिल्ह्यातील डहाणूपर्यंत थेट जोडण्यात येणार आहे. प्रस्तावित वाढवण बंदर आणि ऑफशोअर विमानतळाला जोडण्यासाठी हा मार्ग बांधण्यात येणार आहे. सर्वप्रथम पहिल्या टप्प्यात ५५.१२ किमी मार्गाचं बांधकाम करण्यात येणार आहे.

Maharashtra TimesVadhavan Port: जगातील ‘टॉप १०’ बंदरांपैकी एक, सर्वांत मोठी जहाजे येणार; ‘वाढवण’मुळे विकासाला वेग मिळणार असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास

राज्य सरकारने या प्रकल्पाला २५ नोव्हेंबर २०२५ मध्ये मान्यता दिली होती. या संपूर्ण मार्गाला उत्तन, वसई आणि विरारमध्ये इंटरचेंज असतील. मुख्य सी लिंक २४.३५ किमी लांब असेल आणि वरील तीन कनेक्टर एकूण ३०.७७ किमी लांब असतील. यापैकी उत्तन येथील कनेक्टर ९.३२ किमी, वसई कनेक्टर २.५ किमी आणि विरार कनेक्टर १८.९५ किमी लांब असेल. यासह विरारमधील अरनाळा किल्ल्याजवळ एक १.२ किमी लांब बोगदासुद्धा असेल. हा संपूर्ण मार्ग आठपदरी असेल. प्रत्येक कनेक्टर सहापदरी असतील.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा