नगरपालिका निवडणुकांच्या निकालांनी वाशिम जिल्ह्यात मोठी हालचाल निर्माण झाली आहे. विविध पक्षांच्या कामगिरीतून जिल्ह्यातील राजकारणाची दिशा…
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पंकज गाडेकर, वाशिम: वाशिम जिल्ह्यातील चार नगरपरिषद व एका नगरपंचायतीचा निकाल समोर आला असून रिसोड आणि वाशिममध्ये भाजपचे दोन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडून आले आहेत तर कारंजामध्ये भाजपच्या उमेदवाराने विजय मिळवला आहे. मंगरूळपीर नगरपरिषदमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराने भाजपच्या उमेदवारांचा पराभव करत विजय मिळवला आहे. तर मालेगाव नगरपंचायतमध्ये शिवसेना शिंदे पक्षाच्या उमेदवाराने काँग्रेसच्या आणि भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत मालेगाव नगरपंचायत वर भगवा फडकवला आहे.
वाशिम जिल्ह्यातील चार नगरपरिषद व एका नगरपंचायतीमधील एकूण 124 नगरसेवक पदांपैकी भाजपचे तब्बल 49 उमेदवार निवडून येत भाजप जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे तर एम आय एम चे 19 नगरसेवक निवडून येत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळवले आहे. त्या पाठोपाठ काँग्रेसच्या 18, ठाकरे आणि शिंदे यांच्या सेनेला प्रत्येकी 14 जागेवर विजय मिळवता आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला या ठिकाणी फक्त सहा जागेवर आपले खाते उघडता आले आहे. जिल्ह्यात आठ जागेवर अपक्षांनी मजल मारली. मात्र, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या ठिकाणी साधे खाते खोलता आलेले नाही.
रिसोड नगर परिषद भाजपा चे भगवान क्षीरसागर हे 913 मतांनी विजयी…
वाशिम भाजपचे अनिल केंदळे 7769 मतांनी विजयी.
मंगरूळपीर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अशोक परळीकर 4490 मतांनी विजयी
कारंजा एमआयएमच्या फरीदाबानो मोहम्मद शफी पुंजानी 110 मतांनी विजयी
मालेगाव नगर पंचायत मध्ये शिवसेना शिंदे पक्षाचे ओमप्रकाश खुरसडे 289 मतांनी विजयी जिल्ह्यातील निवडून आलेल्या नगरसेवकांचे पक्षीय बलाबल
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा