Headlines

fake birth- death certificate racket busted in nandurbar five people including lawyer arrested ; नंदुरबारमध्ये बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्र रॅकेटचा पर्दाफाश; पालिका कर्मचाऱ्यासह 5 जण अटकेत


Nandurbar Crime: नंदुरबारमध्ये बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांचा मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात वकिलासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

nandurbar crime
nandurbar crime(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, नंदुरबार: नंदुरबार शहरात गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेला बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांचा मोठा गैरप्रकार उघडकीस आला असून, सायबर कॅफेमधून बनावट सरकारी शिक्क्यांचा वापर करून बोगस दाखले तयार केले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

या प्रकरणी सायबर कॅफेचालक, नगरपरिषदेचा ऑपरेटर, पालिकेचा शिपाई, वकील व आणखी एक व्यक्ती अशा एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पालिकेचा कर्मचारी सहभागी असल्याचे समोर आले आहे. यात मोठे रॅकेट सहभागी असल्याची शक्यता आहे.

नंदुरबार शहरातील शास्त्री मार्केट परिसरात असलेल्या आर. के. ऑनलाइन सायबर कॅफे येथून हा गैरप्रकार चालत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिस निरीक्षक नीलेश देसले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, २९ जानेवारी रोजी पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत बनावट सरकारी शिक्के, जन्म-मृत्यूचे बनावट दाखले, लॅपटॉप, प्रिंटर, संगणक व पाच मोबाइल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Maharashtra TimesBeed Crime: मैत्रीचा धक्कादायक शेवट! रायमोहा परिसरातील खुनाचा 12 तासांत छडा, आरोपीला अटक; कारण आलं समोर…
अनिल यशवंत कोळी (न. प. ऑपरेटर), रिजवान सुभान खान (सायबर कॅफेचालक), इमरान याकूब पिंजारी (वकील), लाला ऊर्फ मोहम्मद अली मोहम्मद युसूफ पटेल (नगरपरिषद शिपाई) आणि शेख शफिक शेख इसाक कुरेशी ( सायबर कॅफेशी संबंधित ) अशी आरोपींची नावे आहेत.

नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक तथा जन्म-मृत्यू नोंद विभागाचा अतिरिक्त कार्यभार असलेले युवराज श्रीपत चव्हाण यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने ९ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे .

Maharashtra TimesLatur Crime: लातूरच्या आंबेडकर चौकात आमदार अमित देशमुखांसमोर हत्येचा थरार, गाडी थांबवली, पण पुढे….
या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनी सरकारी प्रमाणपत्रांसाठी केवळ अधिकृत कार्यालये व सरकारमान्य केंद्रांशीच संपर्क साधावा. कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. – श्रवण दत्त. एस, जिल्हा पोलिस अधीक्ष

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा