Headlines

मित्रांची भेट ठरली अखेरची; भरधाव कंटेनरची कारला धडक, तीन मित्रांचा जागीच मृत्यू| Maharashtra Times


Wardha Car Accident: वर्धा जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे.अल्लीपूर-धोत्रा मार्गावर भरधाव कंटेनरने कारला धडक दिल्याने तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी आहे.

जय पवार निवडणुकीच्या मैदानात? नगराध्यक्षपदासाठी चर्चा; बारामतीकरांनी मनातलं सांगितलं

म.टा. प्रतिनिधी, वर्धा: वर्धा जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एका भरधाव कंटेनरने कारला जबरी धडक दिल्यामुळे कारमधील तीन युवकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबोरबर कारमधील चौथा प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. अल्लीपूर-धोत्रा मार्गावरील एकुर्ली फाट्याजवळ मंगळवारी (4 नोव्हेंबर) रात्री 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

मृत युवकांचे नावे गौरव गावंडे (वय 32) निशांत वैद्य (वय 35) आणि वैभव शिवणकर (वय 28) अशी आहेत. तर भूषण वडनेरकर (वय 28) हा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर सावंगी मेघे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गौरव गावंडे हा मुंबईहून आपल्या गावी आला होता. त्याला घेण्यासाठी भूषण वडनेरकर कारने धोत्रा चौकात गेला. त्याच्यासोबत निशांत वैद्य आणि वैभव शिवणकर हेसुद्धा होते. तिथून निघून ते चौघे कारने अल्लीपूरच्या दिशेने रवाना झाले. परत येत असताना एकुर्ली फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली.

Maharashtra TimesRatnagiri News: यात्रेला गेले ते परतलेच नाहीत; देवीच्या दर्शनानंतर चक्कर, दोन रुग्णालय फिरले पण… दुर्दैवी घटना

यात दुर्घटनेत गौरव व निशांत यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी भूषणने स्वत:ला सावरत वडिलांना फोन करून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर वडील शिवदास वडनेरकर आणि भाऊ मयूर घटनास्थळी पोहचले. त्यानंतर त्यांनी भूषण आणि वैभवला सावंगी रुग्णालयात दाखल केले. परंतू, उपचारादरम्यान वैभवचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर, पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे.

जय पवार निवडणुकीच्या मैदानात? नगराध्यक्षपदासाठी चर्चा; बारामतीकरांनी मनातलं सांगितलं

नागपूरमध्ये ही अपघातात तिघांचा मृत्यू

नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरसुद्धा बुधवारी (5 नोव्हेंबर) अपघात झाला आहे. यामध्ये एका खसगी बसने एका कारला धडक दिल्यामुळे कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. खासगी बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. कपिल मोहनलाल सहानी (50), अमित अग्रवाल (51), संदीप केदारनाथ सोनी (51) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. नागपूर-जबलपूर महमार्गावर वडांबा गावामध्ये जाण्याकरिता असलेल्या कट पॉईंट च्या दरम्यान हा अपघात घडला. जबलपूरहून नागपूरला येत असलेल्या सत्यम ट्रॅव्हल्सने समोरून येणाऱ्या कारला धडक दिली.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा