परभणी : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्याची पार्श्वभूमी असतानाही खासदार संजय (बंडू) जाधव यांनी आयोजित केलेला शेतकरी मेळावा परभणीत रविवारी गोंधळाच्या बाताबरणात पार पडला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या या मेळाव्यात खासदार जाधव भाषण करत असतानाच काही जणांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने एकच गोंधळ उडाला. परिस्थिती तणावपूर्ण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत घोषणाबाजी करणाऱ्यांना सभास्थळाबाहेर काढले. या मेळाव्याला परभणी जिल्ह्यासह
आसपासच्या भागातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. मात्र, मेळाव्यापूर्वीच जरांगे पाटील यांच्या भूमिकेमुळे वातावरण तापले होते. जरांगे यांनी खासदार संजय जाधव यांना फोन करून मेळावा रद्दकरण्याची विनंती केली होती.
मात्र, ऐनवेळी मेळावा रद्द करण्यास जाधव यांनी नकार दिला. याबाबत भूमिका स्पष्ट करताना जाधव म्हणाले की, या कार्यक्रमाची गेल्या १५ दिवसांपासून तयारी सुरू होती.
