परभणीतील शेतकरी मेळाव्यावरून मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील प्रचंड आक्रमक झाले आहेत. खासदार संजय जाधव यांना थेट इशारा देत त्यांनी हा मेळावा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. परभणीच्या मेळाव्यात काही गडबड झाली तर मी जबाबदार राहणार नाही. मी
.
मनोज जरांगे यांनी खासदार संजय जाधव यांना फोन करत संताप व्यक्त केला आहे. शिरसाट प्रमाणपत्र रद्द करतात आणि तुम्ही मेळावे घेत आहात. तुम्ही मेळावा घेऊ नका नाही तर मी कार्यक्रमस्थळी येईल, मग एकनाथ शिंदेंना नांदेडला जाणं अवघड होईल, राज्य अस्थिर करू नका. बंडू जाधव यांनी शिरसाट यांचे ऐकूण हा कार्यक्रम आयोजित केला आहे. शिरसाट यांचे ऐकूण मराठ्याच्या अंगावर येणार असतील तर संजय जाधव संपून जातील, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, संजय जाधवांना वाटते की मी सत्ताधारी पक्षात गेलो आता काय होणार. शिरसाट यांनी जे प्रमाणपत्र रद्द केले ते पुन्हा मिळेपर्यंत आमचे शिंदे यांच्यासोबत चांगले संबंध होऊ शकत नाही. मराठ्यांच्या छाताडावर मेळावा घेत आहे. यांनी शेतकऱ्यांना काय दिले आहे? आमची प्रमाणपत्र देईपर्यंत आमच्या मतदारसंघात कार्यक्रम घ्यायचा नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
..तर शिंदेंना माघारी जाणं अवघड होईल
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, परभणीमधील शेतकरी मेळावा रद्द करा तिथे काही गडबड झाली तर मी जबाबदार राहणार नाही. मी आजपर्यंत कुठेही गेलो नाही पण जर कार्यक्रम होत असेल तर मी चाल करत तिथे येईल. तुम्हाला नेता महत्त्वाचा आहे की समाज महत्त्वाचा आहे. समाजासाठी तुम्ही कार्यक्रम रद्द करा. एकनाथ शिंदेंना सांगा समाजासाठी तुम्ही येऊ नये. चार प्रमाणपत्र जे रद्द करण्यात आले ते मिळेपर्यंत शिंदेंनी मतदारसंघात येऊ नये. मी जर तिथे आलो तर एकनाथ शिंदेंना माघारी जाणं अवघड होईल. तुमच्यामुळे राज्य अस्थिर होईल. मला तुमच्या मेळाव्याशी काही देणंघेणं नाही, पण समाजासाठी तुम्ही हा कार्यक्रम रद्द करा. तुम्हाला नेता महत्त्वाचा आहे की समाज? मी आजपर्यंत कुठेही गेलो नाही, पण कार्यक्रम झालाच तर मी स्वतः तिथे चाल करून येईन.

..म्हणून तुम्ही मोठे झालात का?
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, लोकांनी तुम्हाला निवडून दिले आहे, मग शिंदेंना मराठ्यांच्या उरावर आणून नाचवायचे आहे का? निवडून आलात म्हणजे खूप मोठे झालात का? कोणामध्ये किती दम आहे हे बंडू जाधवांनी अजिबात तपासून बघू नये. संजय शिरसाट यांनी मराठा समाजाचे वाटोळे केले आहे. ज्या सरकारने आणि नेत्यांनी शेतकऱ्यांचे वाटोळे केले, ते आता लोकांना काय देणार. हे ही वृत्त वाचा मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस:12 सप्टेंबरला मराठा समाजाची बैठक, मुंबईतील आंदोलनाची घोषणा करण्याचा इशारा, विखे पाटील पुन्हा मध्यस्थी करणार?

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. अंतरवाली सराटीत सुरू झालेल्या या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत असून, रात्री उशिरापर्यंत मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी दाखल होत आहेत. पहाटे ३ वाजेपर्यंतही आंदोलकांची ये-जा सुरू होती. अनेक आंदोलकांनी आंदोलनस्थळीच मुक्काम केला असून, पुढील काही दिवस अंतरवालीत थांबण्याची तयारी केल्याचे चित्र आहे. वाचा सविस्तर
