Headlines

Vandana Gupte : ‘नाटकाच्या प्रयोगात फोन वाजला की अभिनेते थांबतात, मला त्यांचा राग येतो’; स्पष्टच बोलल्या अभिनेत्री वंदना गुप्ते


Vandana Gupte Exclusive : काही कलाकार नाटकाच्या प्रयोगादरम्यान प्रेक्षकांपैकी कुणाचा फोन वाजला तर लगेच प्रयोगमध्येचं थांबवून संताप व्यक्त करतात. यावर आता वंदना गुप्ते यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

Vandana Gupte Exclusive
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – नाटकाचा प्रयोग सुरू होण्यापूर्वी प्रेक्षकांना आपापले फोन सायलेंटवर ठेवण्याची किंवा बंद करण्याची सूचना दिली जाते. मात्र, काही वेळेस नाटकाचा प्रयोग सुरू असताना एखाद्या प्रेक्षकाचा फोन मोठ्यानं वाजतोच. याबद्दल अनेक कलाकार प्रयोग संपल्यानंतर अथवा प्रयोग मध्येच थांबवून संताप व्यक्त करतात. अशातच आता यावर सुप्रसिद्ध ज्येष्ठ मराठी अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांचं मत मांडलं आहे. ‘

काय म्हणाल्या वंदना गुप्ते?

वंदना गुप्ते म्हणाल्या की, ‘नाटक सुरू असताना कुणाचा फोन वाजला तरीही मी कधीच थांबत नाही. ही आजची मुलं थांबतात, दर्शवतात. कशाला? म्हणजे तुम्ही नाटकात इन्व्हॉल्व नसता. तीन तासांच्या प्रयोगामध्ये तुमची इन्व्हॉल्व्हमेन्ट नसेल, ह्याचा अर्थ तुमचं लक्ष नाहीये. फोनची बेल वाजली तर तुमचं लक्ष विचलित होत असेल तर असं कसं चालेल?’

Maharashtra TimesPrasad Khandekar : ‘तुझ्याबरोबर हसता येतं, मनातलं बोलता येतं, काहीही न बोलताही खूप काही समजतं’, नम्रता संभेरावसाठी प्रसादची खास पोस्ट
”चार चौघी’ नाटकात माझा २० मिनिटांचा मोनोलॉग होता. तो मोनोलॉग सुरू व्हायच्या आधी मी डोअर किपरला सूचना देऊन ठेवायचे. त्या २० मिनिटांमध्ये कुणालाही बाहेर जाऊ द्यायचं नाही आणि बाहेरून कुणाला आतमध्ये येऊ द्यायचं नाही. कारण मी ते एकटीनं बोलायचे. बाकी इतर वेळी सगळ्यांसोबत संवाद असतात. त्यामुळे फोन वाजला तरी प्रत्येकवेळी त्यांना आठवण करून द्यायची गरज नाही. प्रेक्षकांनाही समजतं, त्यांच्याकडून चूक झालीये. हे शिक्षण मला अरविंद देशपांडे यांच्याकडून मिळालं.’

स्वतःचा अनुभव सांगताना वंदना गुप्ते म्हणाल्या की, ‘मी अरविंद देशपांडे यांच्यासोबत ‘प्रेमाच्या गावा जाऊया’ हे नाटक केलेलं. त्यात माझी खूप छोटी भूमिका होती. त्या नाटकाचा कोकणात दौरा होता आणि ओपन थिएटर होतं. रंगमंचावर अरविंद देशपांडे, मी आणि निवेदिता सराफ होतो. पहिल्या अंकाचा पडदा पडतो आणि माझी एक्झिट होते, असं होतं. मागे आंब्याचं झाड होतं, त्यावरचा आंबा माझ्यासमोर पडला. मी जाता-जाता तो आंबा उचलला. नंतर आतमध्ये आल्यावर अरविंद देशपांडे माझ्यावर खूप भडकले. ‘त्या दोन तासात तुमची नाटकाच्या बाहेरचा विचारच कसा करता? तो आंबा तिथे राहिला असता तर काय झालं असतं?’ असं अरविंद सर मला म्हणाले. त्यामुळे असं कोणी थांबलं की, मला राग येतो. पण, मी बोलत नाही. आजच्या मुलांनी याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आणि प्रयोग पुढे सुरू ठेवला पाहिजे.’

Maharashtra TimesOmkar Karve On Producer : ‘इंडस्ट्रीला लागलेली किड, तो नुसत्या शिव्या घालत नाही तर लाथाबुक्क्यांनी मारतो’, मराठी अभिनेत्याचे निर्मात्यावर गंभीर आरोप
दरम्यान, वंदना गुप्ते यांच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यांनी ‘बाईपण भारी देवा’, ‘अशी ही जमवा जमवी’, ‘पछाडलेला’, ‘अखेरचा सवाल’ ‘आणि काही ओली पाने’, ‘गगनभेदी’, ‘चारचौघी’, ‘चार दिवस प्रेमाचे’ यांसारख्या मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे.