Headlines

Flat Owners Rights; फ्लॅटचा ताबा मिळाला तरी तुम्ही घरमालक नाही; मालमत्तेची कायदेशीर मालकी नक्की कशी ठरते? कागदपत्रांचा खेळ समजून घ्या


Property Rights: आपल्या स्वपातल्या घराच्या चावी मिळणे प्रत्येकासाठी आनंद आणि अभिमानाचा क्षण असतो. वर्षांनुवर्षे केली बचत, ईएमआय आणि दीर्घ प्रतिक्षेनंर बिल्डरने चाव्यासह घराचा ताबा दिल्यावर असं वाटतं की आता घर पूर्णपणे आपले झाले आहे. पण फक्त चावी मिळणे आणि घराचा कायदेशीर मालक बनणे या नेहमीच एकसारख्या गोष्टी नसतात.

घर किंवा जागेचा ताबा मिळाल्यावर खरेदीदाराने आवश्यक कायदेशीर कागदपत्रे आणि नोंदणीकृत हस्तांतरणपत्र पूर्ण झाले आहे की नाही याची खात्री केली पाहिजे. त्यामुळे केवळ चावी मिळाली म्हणून आपण कायदेशीर मालक बनलो असं गृहीत धरणं पूर्णपणे चुकीचं आहे. घर खरेदीदारांनी ताबा, नोंदणी आणि मालकी हक्काचे हस्तांतरण यांमधील फरक समजून घेतला पाहिजे.

RERA कायदा 2016 नुसार बिल्डर किंवा प्रवर्तकाने खरेदीदाराच्या नावावर नोंदणीकृत हस्तांतरणपत्र करणे बंधनकारक आहे. यामुळे खरेदीदाराला फ्लॅटची कायदेशीर मालकी मिळते. याव्यतिरिक्त, खरेदीदाराला इमारतीच्या सामायिक जागांमध्ये वाटा मिळतो.

Maharashtra Timesनवीन प्रॉपर्टी लगेच विकण्याच्या भानगडीत पडू नका! नफ्यावर कर सवलत मिळवण्यासाठी आधी प्रॉपर्टीचे नियम लक्षात घ्या

घराचा ताबा अन् मालकी दोन्ही वेगवेगळ्या

प्रत्येक घर खरेदीदाराला माहिती पाहिजे की मालमत्तेचा ताबा मिळणे आणि मालकी हक्क मिळणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला फ्लॅटच्या चाव्या मिळाल्या म्हणजे तुम्हाला ताबा मिळाला आणि तुम्ही त्यात राहू शकता, तर फ्लॅटवर तुमचे कायदेशीर हक्क म्हणजे मालकी आहे.

आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर बिल्डर तुम्हाला फ्लॅटचा ताबा आणि चाव्या देऊ शकतो, पण रजिस्टर्ड ट्रान्सफर लेटर किंवा इतर आवश्यक मालकी कागदपत्रे तुमच्या नावावर तयार करून नोंदणीकृत झाली की नाही, याची खात्री केली पाहिजे.

Maharashtra TimesJio Platforms IPO: रिलायन्स जिओच्या आयपीओवर सेबीची मोहोर, 37700 कोटींचा असेल भारताचा सर्वात मोठा IPO; पाहा A टू Z डिटेल्स

मालकी हक्क हस्तांतरणाबद्दल RERA नियम काय?

रेरा कायद्यातील कलम 17 फ्लॅटच्या मालकी हक्कहस्तांतरण संबंधित असून यानुसार बिल्डर किंवा प्रमोटरने खरेदीदाराच्या नावे नोंदणीकृत हस्तांतरणपत्र करणे बंधनकारक आहे. यामध्ये फ्लॅट आणि सामायिक जागांमधील खरेदीदाराच्या हिश्श्याचा समावेश असतो.

स्थानिक कायद्यात वेळेची मर्यादा नमूद केली नसल्यास RERA नुसार ओसी मिळाल्यापासून 3 महिन्यांमध्ये हस्तांतरणपत्र पूर्ण करणे अनिवार्य आहे. त्यामुळे, फ्लॅटच्या चाव्या मिळणे म्हणजे कायदेशीर मालकी हक्काचे हस्तांतरण पूर्ण झालं असं समजून निवांत बसू नका.

Maharashtra TimesSubhash Chandra: कर्ज फेडू नका असा सल्ला मला मुकेश अंबानींनी दिलेला, सुभाष चंद्रा यांच्या आरोपांवर आता रिलायन्सचे उत्तर

घराचा ताबा मिळाल्यावर कोणत्या गोष्टी तपासायच्या

पझेशन लेटर : फ्लॅट क्रमांक, क्षेत्रफळ, मजला, प्रकल्प आणि ताबा मिळण्याची तारीख अचूक असल्याची खात्री करा.

नोंदणीकृत हस्तांतरणपत्र : तुमच्या नावावर नोंदणीकृत आहे की नाही याची खात्री करा.

ओसी म्हणजे भोगवटा प्रमाणपत्र : ओसीची एक प्रत मिळवा आणि त्यात तुमच्या इमारत/प्रकल्पाचा समावेश आहे की नाही तपासा.

विक्री करार : तुम्हाला मिळणाऱ्या फ्लॅटची वैशिष्ट्ये आणि तपशील कराराशी जुळतात याची खात्री करा.

पेमेंट रेकॉर्ड : मालमत्तेची किंमत, कर, नोंदणी आणि इतर भरणा यांच्या सर्व पावत्या जपून ठेवा.

मेंटेनन्स आणि सुविधा नोंदी : मेंटेनन्स, वीज, पाणी आणि इतर शुल्कांच्या नोंदी ठेवा.

कॉमन एरियाचे हक्क : कॉमन एरियातील तुमच्या प्रमाणात वाट्याशी संबंधित कागदपत्रे सत्यापित करा.

दुसरीकडे, बिल्डर म्हणाला की “चावी तुमच्याकडे आहे, त्यामुळे आता तुम्हीच मालक आहात” तर त्याच्यावर लगेच विश्वास ठेवू नका. खरेदीदाराने आपल्या नावावर नोंदणीकृत मालकी हक्काच्या कागदपत्रांची मागणी केली पाहिजे आणि केवळ शब्दांवर अवलंबून राहणे मूर्खपणाचे ठरेल.

एकूणच घर किंवा मालमत्तेची अचूक कागदपत्रे तुमच्याकडे असली पाहिजे जेणेकरून भविष्यात फ्लॅट विकणे, कोणाला भेट देण्यासाठी, वारसा हक्काने हस्तांतरित करणे, बँकेकडून कर्ज घेण्यासाठी किंवा कायदेशीर करारामध्ये मालकी सिद्ध करण्यासाठी या कागदपत्रांची गरज पडू शकते.