Headlines

Nepal Flood: नेपाळवर पुन्हा महापुराचं संकट? प्रशासनाकडून अलर्ट जारी, 579 जणांचा करुण अंत, 1924 अद्याप बेपत्ता


वृत्तसंस्था, काठमांडू: नेपाळ-तिबेट सीमेवरील विध्वंसक जलप्रलयाने हाहाकार माजवला असताना नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती धोका व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीआरआरएमए) पुन्हा महापुराचा इशारा दिला. नेपाळमधील ५७९ आणि तिबेटमधील पाच मृतांसह प्रलयबळींची संख्या शुक्रवारी ५८४वर पोहोचली असून, १९२४ जण अद्याप बेपत्ता आहेत.

हिमनद्यांचे कडे कोसळून मध्य नेपाळच्या रसुवा आणि अन्य भागांसह तिबेटमध्ये बुधवारी आलेल्या जलप्रलयामुळे झालेल्या विध्वंसानंतर शुक्रवारी बचावकार्याला आणखी गती मिळाली. अनेक शहरे, गावे, रस्ते, पूल, जलविद्युत प्रकल्पांना जलप्रलयाचा तडाखा बसला आहे. या प्रलयामुळे नेपाळमध्ये सुमारे एक हजार जण, तर तिबेटमध्ये ५५८ जण बेपत्ता आहेत.

Maharashtra Timesतुमची मदत नको! भारतासह सगळ्याच देशांना नेपाळचा स्पष्ट नकार; 2015 च्या पुनरावृत्तीची भीती?विध्वंसक जलप्रलयामुळे अनेक ठिकाणी जलपातळी वाढली असून, तिथे पुन्हा महापुराचा धोका आहे.‘बुधवारी ज्या ठिकाणी अचानक पूर आला होता, त्याच ठिकाणी चिखलमिश्रित पाण्याची पातळी वाढली आहे आणि त्या परिसरात आणखी पूर येण्याचा धोका आहे,’ असे एनडीआरआरएमएने म्हटले. तिबेटकडील एक धरण फुटल्याचा दाखल देऊन नेपाळ पोलिसांनीही दक्षतेचा इशारा दिला आहे.

कोचेन खोला आणि पुरेपू या नद्यांच्या संगमावर नेपाळमध्ये मोठे तलाव तयार झाले आहेत. या तलावात सुमारे दोन दशलक्ष घटमीटर पाणी साचले असून, येत्या काही दिवसांत या पाण्यात भर पडणार असल्याने ते फुटण्याची भीती चीनने वर्तवली आहे.

जलप्रलयामुळे तिबेटमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून, ५५८ जण बेपत्ता आहेत. त्यात २६० परदेशी पर्यटक असल्याचे चीनकडून शुक्रवारी सांगण्यात आले. मात्र, ते कोणत्या देशाचे आहेत, हे अद्याप चीनने जाहीर केलेले नाही.

Maharashtra TimesNepal Flash Flood: दोन मुली अमेरिकेत सोडून नेपाळला गेलेले भारतीय आई-वडील बेपत्ता; मुली एका कॉलच्या प्रतीक्षेत‘हिमकडा कोसळल्याने दुर्घटना’
बीजिंग : नेपाळमध्ये उंच पवर्तीय हिमकडा कोसळल्याने जलप्रलय आल्याचे चीनने म्हटले आहे. ‘या आपत्तीच्या कारणांबाबत चीन आणि नेपाळमधील सरकारी संस्था, तज्ज्ञांच्या निरीक्षणांची नोंद आम्ही केली आहे. नेपाळमधील उंचावरील हिमकडा कोसळल्याने हे संकट निर्माण झाल्याचे त्यांचे विश्लेषण ग्राह्य धरले आहे’, असे चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी सांगितले.

जिनपिंग यांच्याकडून आढावा
बीजिंग: चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांनी शुक्रवारी बैठक घेऊन तिबेटमधील जलप्रलयानंतरच्या स्थितीचा आढावा घेतला. बचावकार्याला वेग देण्याबरोबरच बेपत्ता असलेल्या चिनी आणि परदेशी नागरिकांच्या शोधासाठी प्रयत्नांची शिकस्त करण्याची सूचना जिनपिंग यांनी बचावपथकांना दिली.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत