Saurabh Chougule shares Samruddhi Mahamarg experience : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातांच्या मालिकेनं जनसामान्यांच्या मनात या महामार्गाविषयी धास्ती बसविली आहे. आता अभिनेता सौरभ चौगुले याला देखील असाच काहीसा अनुभव आला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: समृद्धी महामार्गावर दररोज हजारो वाहनांची ये जा होत आहे.मात्र, या हाय-स्पीड कॉरिडॉरवर वाहनात अचानक बिघाड झाल्यास, अपघात घडल्यास किंवा वैद्यकीय आणीबाणी उद्भवल्यास वेळेवर कोणतीही तातडीची आपत्कालीन मदत उपलब्ध होत नसल्याचं वास्तव आता समोर येत आहे. त्यामुळं प्रवाशांची सुरक्षितता पूर्णपणे वाऱ्यावर असल्याचं चित्र आहे. मराठी अभिनेता सौरभ चौगुले यानं देखील आता आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मदत कशी मागायची?… जवळपास 75 किलोमीटर पर्यंत तिथं काहीच नाही
तर झालं असं की, अभिनेता सौरभ चौगुलेनं नुकताच समृद्धी महामार्गावरून प्रवास केला. इगतपुरी इथं आल्यानंतर त्याच्या गाडीचं एक चाक पंक्चर झालं, अजून 200 मीटरवर गेल्यावर दुसरं चाक पंक्चर झालं. सुदैवानं दुसरं चार पूर्णपणे पंक्चर झालं नव्हतं, त्यातली हवा कमी झाली होती. यानंतर मदत मिळेल म्हणून तो तसाच पुढं जाण्याचा प्रयत्न करत होता. पण इगतपुरी ते कल्याणपर्यंत कुठलीच सुविधा नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. या 75 ते 80 किलोमीटर समृद्धी महामार्गवर ना कुठली वॉशरूमची सुविधा, ना पंक्चर काढण्यासाठी काही यंत्रणा नसल्यानं या गैरसोयीबद्दल सौरभने सोशल मीडियावर तक्रार केली आहे.
‘इथे माझ्या जागी कोणी महिला असती तर तीनं काय केलं असतं?’ असा मोठा प्रश्न त्यानं उपस्थित केला आहे. अनेकदा फोनला नेटवर्क नसतं. तिला मदत मिळायला देखील किती तरी वेळ लागेल. कारण ती मदत लगेच उपलब्ध होणार नाहीए. याबद्दल प्रशासनानं विचार करावा आणि तिथं आपत्कालीन सुविधा उपलब्ध करून द्यावी असं मत त्यानं व्यक्त केलं आहे.
टायर पंक्चरचा सापळा रचून 18 लाख लुटल्याचा प्रकार समोर
दरम्यान, सौरभनं हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर या समृद्धी महामार्गावरचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावर वाहनांचे टायर फोडून प्रवाशांना लुटण्याच्या धक्कादायक प्रकारा सुरू असल्यानं खळबळ उडाली आहे.
मलढोण आणि दुशिंगवाडी शिवारातील चॅनेल क्रमांक ५३८ ते ५४३ दरम्यान अंधारात दरोडेखोरांच्या टोळीनं चार वाहनांना लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या वकिलाच्या कुटुंबाला घेरून मारहाण करीत १८ लाख ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटण्यात आला. दरम्यान, आणखी एका वाहनाचे टायर फोडून लूट करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे.
त्यामुळं सौरभच्या गाडीची चाकं पंक्चरचा होण्यामागे असाच काहीच प्रकार असावा, तसंच असे अनुभव आपल्यालाही आल्याचं अनेक नेटकऱ्यांनी सौरभच्या व्हिडिओवर कमेंट करत म्हटलं..
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा