कणकवली, प्रतिनिधी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे रविवार, ३० ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते विविध नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, कणकवली येथील ओमगणेश निवासस्थानी रविवारी सायंकाळी ४ वाजता पालकमंत्री नितेश राणे जनतेच्या गाठीभेटी घेणार आहेत. यावेळी नागरिकांच्या विविध समस्या व प्रश्न जाणून घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
पालकमंत्री राणे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून, संबंधित पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून तयारी सुरू आहे.
