मध्य रेल्वे
स्थानक : विद्याविहार ते ठाणे
मार्ग : पाचवी आणि सहावी मार्गिका
वेळ : सकाळी ८ ते दुपारी ३.३०
परिणाम : ब्लॉकवेळेत पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरील मेल-एक्स्प्रेस अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. यामुळे गाडी क्रमांक ११०५५ गोदान, (११०६१) जयनगर, (१६३४५) नेत्रावती, (१७२२२) काकीनाडा पोर्ट, (२२२२६) सोलापूर वंदे भारत, (११०१०) सिंहगड, (१२१२४) डेक्कन क्वीन, (१२१२६) प्रगती, (१२१३४) मंगळूरू, (१३२०१) राजगीर, (१७२२१) काकीनाडा, (१२१६८) बनारस, (१२३२१) हावडा आणि (१२८१२) हटिया एक्स्प्रेस विलंबाने धावणार आहे.
स्थानक : ठाणे ते वाशी/नेरुळ
मार्ग : अप आणि डाऊन
वेळ : सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१०
परिणाम : ब्लॉकवेळेत ठाणे ते वाशी नेरूळ पनवेलदरम्यान अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते वाशी/पनवेलदरम्यान आणि बेलापूर ते उरणदरम्यान रविवार वेळापत्रकानुसार लोकल धावणार आहेत.
स्थानक : वसई रोड ते भाईंदर
मार्ग : अप आणि डाऊन जलद
वेळ : शनिवारी रात्री ११.३० ते रविवारी पहाटे ४.४५
परिणाम : ब्लॉकवेळेत अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. यामुळे रात्री उशिरा धावणाऱ्या लोकल विलंबाने धावणार आहे. रात्रकालीन ब्लॉकमुळे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही.
MPSC Paper Leak : संशय नको, 10 प्रश्न मुद्दाम चुकीचे लिही, एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात ऋतुजा पाटीलला दिलेला सल्ला; लग्नासाठी जमवलेल्या 12 लाखांची 77 प्रश्नांसाठी डीलरक्षाबंधनदिनीही विलंबाची भेट
रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी निघालेल्या बहीणभावांना शुक्रवारी मध्य रेल्वेच्या कारभाराचा फटका बसला. धीम्या आणि जलद मार्गावरील लोकल फेऱ्या विलंबाने धावत असल्याने लोकलसह रेल्वे स्थानकांवर गर्दी वाढली होती. यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. शुक्रवारी सुट्टी असल्याने सकाळी रक्षाबंधन करून मुंबई फिरण्यासाठी आलेल्या भावा-बहिणींची लोकलमध्ये गर्दी दिसून आली. गणेशोत्सवाच्या खरेदीसाठीही अनेकांनी रक्षाबंधनाचा मुहूर्त निवडला. यामुळे अनेक प्रवासी खरेदीच्या बॅग, पिशव्यांसह लोकलमधून प्रवास करत होते. अशातच लोकल विलंबाने धावत असल्याने दादर, घाटकोपर, कुर्ला स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती. गर्दीमुळे अनेक प्रवासी तिकीट नसतानाही, प्रथम श्रेणीच्या डब्यात आणि वातानुकूलित लोकलमध्ये बिनदिक्कत प्रवास करताना आढळले.

