Headlines

Home Insurance Claim Rejection Reasons; महापूर, ढगफुटीपासून स्वत:चं घर वाचवा; नुकसान झाल्यास मिळेल भरपाई, पण 5 चुकांमुळे फेटाळला जाऊ शकतो दावा


Nepal Floods: नेपाळमध्ये थैमान घातलेल्या विनाशकारी पूर सध्या जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. असंख्य भारतीय पर्यटक या पुरामुळे नेपाळमध्ये अडकले असून भारतातील अनेक जिल्ह्यांमध्येही पुराचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुराचा धोका असलेल्या ठिकाणी राहणारे लोक पूरासारख्या नैसर्गिक आपत्तींपासून आपली घरे आणि वाहने सुरक्षित ठेवण्यासाठी विमा खरेदी करतात.

पण तुम्हाला माहित आहे का की, काही चुकांमुळे पुराच्या पाण्यामुळे नुकसान होऊनही विमा कंपन्या तुमचा गृह विमा नाकारू शकतात? होय, तुम्हीपण असाच विमा उतरवला असेल तर अशा परिस्थितींबद्दल जाणून घेऊया ज्यामध्ये घर किंवा वाहन विमा नाकारला जाऊ शकतो.

Maharashtra Timesअखेरचा कॉल, मग फोन बंद; अर्धवट मेसेजनं धडधड वाढली; नेपाळमध्ये आप्त अडकलेल्यांची आपबिती

नुकसान भरपाईसाठी विमा गरजेचा

कोणत्याही प्रकारच्या नुकसानीतून सावरण्यासाठी विमा पॉलिसी एकमेव पर्याय नाही. पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाईसाठी विमा कंपनी खूप मदत करू शकते, पण विमा घेण्याआधी अटी व शर्ती नीट न वाचल्यास आणि आवश्यक नियमांची माहिती नसल्यास तुमचा दावा नाकारला जाऊ शकतो. मात्र, दावा मिळवण्यासाठी योग्य प्रक्रिया फॉलो केली पाहिजे.

Maharashtra TimesNepal Flood Update: चीनच्या बेजबाबदारपणामुळे महापूर, नेपाळचे आरोप शेजारी देशाने फेटाळले, फेसबुक पोस्टमधून प्रत्युत्तर

Home Insurance चा दावा केव्हा नाकारला जाईल?

विमा कंपनीला कळवण्यास विलंब करणे

नुकसान झाल्यानंतर विमा कंपनीला तात्काळ माहिती दिली पाहिजे. बरेच लोक या प्रक्रियेत विलंब करतात आणि या विलंबामुळे त्यांचा दावा नाकारला जातो.

नुकसानीचा पुरावा सादर न करणे

पूर किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या घर, वाहन किंवा घरातील इतर वस्तूंचे नुकसान झाल्यास विमा कंपन्यांना पुरावा म्हणून व्हिडिओ आणि छायाचित्रे यांसारखी सर्व कागदपत्रे ताबडतोब गोळा केली पाहिजे.

विमा कंपनीला न कळवता घर दुरुस्त करणे

पूरस्थितीनंतर बरेच लोक विमा कंपनीला न कळवता आपल्या घरांच्या दुरुस्तीचे काम करू लागतात. अशा परिस्थितीत, घरातील पाणी काढणे आणि घर स्वच्छ करणे यासारखी तात्पुरती दुरुस्ती करण्यात हरकत नाही पण, तुम्ही घराच्या भिंती स्वच्छ करण्यासारखी कायमस्वरूपी दुरुस्ती केली, तर विमा कंपनी तुमचा दावा नाकारू शकते.

Maharashtra Times11 जलविद्युत केंद्रं, 40 रस्ते, 19 पूल, 10 पेक्षा अधिक बँका उद्ध्वस्त; पुरामुळे नेपाळवर संकटनुकसानीबद्दल खोटी माहिती देणे

जास्त रकमेच्या दाव्याच्या लोभापायी अनेक लोक नुकसानीबद्दल खोटी माहिती देतात आणि विमा कंपनीला याबद्दल कळताच तुमचा अख्खा दावा नाकारू शकते.

सर्वेक्षकाच्या तपासणीपूर्वी वस्तू फेकून देणे

विमा कंपनीला नुकसानीबद्दल कळवल्यानंतर नुकसानीचे मूल्यांकन आणि नंतर दावा मंजूर करण्यासाठी एक सर्वेक्षक पाठवला जातो. पण बरेच लोक सर्वेक्षण पूर्ण होण्यापूर्वीच पुरामुळे बाधित वस्तू फेकून देतात, ज्यामुळे विमा दावा नाकारला जाऊ शकतो.