राज्याचा उत्सव म्हणून साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सव मंडळांना प्रसादाची शुद्धता आणि भाविकांच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. मंडळांनी भाविकांना शुद्ध व भेसळमुक्त प्रसाद मिळे
.
गणेशोत्सव-२०२६ मधील कायदा व सुव्यवस्थेच्या तयारीसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. उत्सवाचे नियोजन करताना प्रशासन, गणेशोत्सव मंडळे आणि समन्वय समित्यांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी या उत्सवाला व्यापक स्वरूप दिले असून लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून मांडलेला सामाजिक अभिसरण आणि प्रबोधनाचा विचार पुढे नेणे आवश्यक आहे. राज्य उत्सवाचा दर्जा मिळालेल्या गणेशोत्सवाची परंपरा, शिस्त आणि पावित्र्य जपण्याची जबाबदारी प्रशासनासह मंडळे आणि नागरिकांची आहे.

विसर्जन मार्ग खड्डेमुक्त ठेवण्याचे निर्देश
गणेशमूर्तींच्या आगमन व विसर्जन मार्गांवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या मार्गांवर खड्डे राहू नयेत, रात्री पुरेशी प्रकाशव्यवस्था असावी आणि स्थानिक पातळीवरील अडचणी तातडीने दूर कराव्यात, असे फडणवीस यांनी सांगितले. जुन्या गणेशोत्सव मंडळांच्या परवानग्यांचा प्रश्न प्रलंबित ठेवू नये, अशा सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या.
नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई
फटाके आणि लाऊडस्पीकरच्या वापरात नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मोठ्या गणेशमूर्तींच्या मिरवणुकीदरम्यान सुरक्षिततेची पुन्हा तपासणी करून मूर्तीची रचना, नट-बोल्ट, वेल्डिंग आणि अन्य जोडण्या मजबूत असल्याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले.

अफवांवर विश्वास ठेवू नका – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सलोख्याच्या वातावरणात पार पाडण्यासाठी शासन, प्रशासन आणि मंडळांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले. मुंबईतील आगमन व विसर्जन मार्गांवर खड्डे राहणार नाहीत, याची महापालिका प्रशासनाने विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. गणेश मंडळांना पाच वर्षांची परवानगी देण्याबाबत कार्यवाही करण्यात आल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
सोशल मीडियावरून अफवा पसरविण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंडळांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे. संशयास्पद प्रकार आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले. गणेशमूर्तींच्या वाहतुकीदरम्यान लहान मुले आणि भाविकांना सुरक्षित अंतरावर ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
बैठकीला कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, गृह राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा..
नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांशी मुख्यमंत्री फडणवीसांचा संवाद: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनाही मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाचा दिलासा

नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या भीषण महापुराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कैलास मानसरोवर यात्रेसह विविध कारणांसाठी नेपाळ आणि तिबेटमध्ये गेलेल्या पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पूर्णपणे ‘अलर्ट मोड’वर असून, पर्यटकांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी MPSC परीक्षा, मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आणि मुंबईतील टॅक्सी चालकांच्या मुद्द्यावरही सरकारची भूमिका स्पष्ट केली. सविस्तर वाचा
