तुम्ही ज्यांना मतांचा जोगवा देऊन विधानसभेत पाठवता, ते आमदार सभागृहात जाऊन नक्की काय काम करतात? रस्ते, आरोग्य, पाणी, शिक्षण या तुमच्या दैनंदिन समस्यांवर ते सरकारला धारेवर धरतात का, की फक्त बाकांवर थाप मारून निघून जातात? ‘प्रजा फाउंडेशन’ने य़ा NGO ने मुंबईतील आमदारांचे प्रगतीपुस्तक म्हणजेच ‘मुंबई आमदार रिपोर्ट कार्ड २०२६’** जाहीर केले आहे. हिवाळी अधिवेशन २०२४ ते पावसाळी अधिवेशन २०२५ या कालावधीतील कामगिरीचे मूल्यमापन करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या रिपोर्ट कार्डमध्ये काँग्रेस आमदारांनी बाजी मारली आहे, तर सत्ताधारी शिंदेंच्या शिवसेना आणि भाजपच्या आमदार थेट खाली फेकले गेले आहेत. पण सर्वात चिंतेची बाब म्हणजे—गेल्या १५ वर्षांत मुंबईच्या आमदारांची विधानसभेतील कामगिरी तब्बल ७२ टक्क्यांनी घसरली आहे! मुंबईतले टॉप ५ आणि बॉटम ५ आमदार कोण आहेत? आदित्य ठाकरे कितव्या क्रमांकावर आहेत? आणि विधानसभेत लोकप्रतिनिधींचे प्रश्न का कमी होत आहेत? चला, सविस्तर जाणून घेऊया