18,000 रुपयांवरून 72,000 रुपयांपर्यंत वेतन वाढीचा प्रस्ताव
केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या कर्मचारी संघटनांनी 8 व्या वेतन आयोगासमोर आपल्या मागण्या आधीच सादर केल्या आहेत. प्रत्येक संघटनेने आपापल्या निकषांनुसार वेगवेगळ्या फिटमेंट फॅक्टरची मागणी केली असून यापैकी एका संघटनेने आयोगाला किमान वेतन 18,000 रुपयांवरून 72,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे.
Satya Nadella Salary: तुम्ही मंदी, AI च्या चर्चा करत राहा; मायक्रोसॉफ्टच्या सीओंनी उचलला 1 हजार कोटींचा पगार! एवढा पैसा आला कुठून?या मागणीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात थेट 400% वाढ होईल, म्हणजे फिटमेंट फॅक्टर 4 असेल तरच ही मागणी पूर्ण होऊ शकते. पण आठव्या वेतन आयोगासमोर ही मागणी कोणी केली?
400 टक्के पगारवाढीचा प्रस्ताव
डिफेन्स क्षेत्रातील कर्मचारी संघटना भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ – BPMS – ने 8 व्या केंद्रीय वेतन आयोगासमोर 72000 रुपयांपर्यंत किमान मासिक वेतन वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे, जी सध्याच्या सातव्या वेतन आयोगाच्या 18000 रुपयांच्या किमान वेतनापेक्षा 400% जास्त आहे.
16 एप्रिल रोजी BPMS ने एक मसुदा प्रस्ताव सादर केलेला, जो बीपीएमएसचे सरचिटणीस रवींद्र कुमार मिश्रा यांनी प्रसारित केलेला. यामध्ये किमान वेतन, फिटमेंट फॅक्टर, वार्षिक वेतनवाढ आणि प्रस्तावित वेतन मॅट्रिक्स यांसारख्या तपशिलांचा समावेश होता. सातव्या वेतन आयोगाने 3 सदस्यांच्या कुटुंब रचनेच्या आधारावर किमान वेतन कॅलक्युलेट केलेले पण, भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने कुटुंबातील सदस्यांची संख्या तीनवरून पाच करण्याची मागणी केली आहे.
Stock Crash: खटाखट परतावा देणारा शेअर धडाधड आपटला; 400 रुपयांवरून 12 रुपयांवर आला, गुंतवणूकदारांची पंचाईतआतापर्यंत वेगवेगळ्या कर्मचारी संघटनांनी आठव्या वेतन आयोगाला मागण्या आणि सरकारची आर्थिक परिस्थिती या आधारावर आपल्या शिफारसी सादर केल्या असून पुढील काही महिन्यात आयोग अहवाल सरकारला सादर करेल आणि त्यानंतर सरकार अंतिम निर्णय घेईल.
18,000 वरून 72,000 रुपयांपर्यंत वाढल्यास किती फायदा होईल?
वेतन आयोगाने 72,000 रुपयांचे किमान मूळ वेतन लागू केल्यास सध्याच्या 18,000 रुपयांवरून 54,000 रुपयांची थेट वाढ होईल, म्हणजेच नवीन मूळ वेतन सध्याच्या वेतनाच्या चौपट जास्त असेल. मात्र, कर्मचाऱ्याचे पूर्ण वेतन 72,000 रुपये होणार नाही तर मूळ वेतनाव्यतिरिक्त महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता आणि इतर भत्ते जोडले जातील. तसेच इन्कम टॅक्स आणि इतर कपाती देखील लागू होतील. याशिवाय मूळ वेतनातील वाढीचा भविष्यात पेन्शन आणि इतर लाभांच्या कॅलक्युलेशनवरही परिणाम होऊ शकतो.
4 फिटमेंट फॅक्टर असल्यास पगार किती वाढणार?
| अनुक्रमांक | ग्रेड | सध्याचे मूळ वेतन | फिटमेंट फॅक्टर = 4 | अपेक्षित पगारवाढ |
| 1 | लेव्हल 1 | 18,000 रुपये | 72,000 रुपये | 54,000 रुपये |
| 2 | लेव्हल 2 | 19,900 रुपये | 79,600 रुपये | 59,700 रुपये |
| 3 | लेव्हल 3 | 21,700 रुपये | 86,800 रुपये | 65,100 रुपये |
| 4 | लेव्हल 4 | 25,500 रुपये | 102,000 रुपये | 76,500 रुपये |
| 5 | लेव्हल 5 | 29,200 रुपये | 116,800 रुपये | 87,600 रुपये |
| 6 | लेव्हल 6 | 35,400 रुपये | 141,600 रुपये | 106,200 रुपये |
| 7 | लेव्हल 7 | 44,900 रुपये | 179,600 रुपये | 134,700 रुपये |
| 8 | लेव्हल 8 | 47,600 रुपये | 190,400 रुपये | 142,800 रुपये |
| 9 | लेव्हल 9 | 53,100 रुपये | 212,400 रुपये | 159,300 रुपये |
| 10 | लेव्हल 10 | 56,100 रुपये | 224,400 रुपये | 168,300 रुपये |
| 11 | लेव्हल 11 | 67,700 रुपये | 270,800 रुपये | 203,100 रुपये |
| 12 | लेव्हल 12 | 78,800 रुपये | 315,200 रुपये | 236,400 रुपये |
| 13 | लेव्हल 13 | 118,500 रुपये | 474,000 रुपये | 355,500 रुपये |
| 14 | लेव्हल 13 | 131,100 रुपये | 524,400 रुपये | 393,300 रुपये |
| 15 | लेव्हल 14 | 144,200 रुपये | 576,800 रुपये | 432,600 रुपये |
| 16 | लेव्हल 15 | 182,200 रुपये | 728,800 रुपये | 546,600 |
| 17 | लेव्हल 16 | 205,400 रुपये | 821,600 रुपये | 616,200 रुपये |
| 18 | लेव्हल 17 | 225,000 रुपये | 900,000 रुपये | 675,000 रुपये |
| 19 | लेवल 18 | 250,000 रुपये | 100,000 रुपये | 750,000 रुपये |

