RSS वर अमेरिकेत बंदी घालण्याची मागणी, मोहन भागवतांच्या कार्यक्रमाला विरोध – nyc mayor zohran mamdani opposes rss chief mohan bhagwat’s madison square garden event
RSS वर अमेरिकेत बंदी घालण्याची मागणी, मोहन भागवतांच्या कार्यक्रमाला विरोध – nyc mayor zohran mamdani opposes rss chief mohan bhagwat’s madison square garden event
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS चे सरसंघचालक मोहन भागवत हे २५ ऑगस्ट २०२६ पासून अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा आयोजित करण्यात आलाय. २९ ऑगस्ट रोजी न्यू यॉर्कमधील प्रसिद्ध ‘मॅडिसन स्क्वेअर गार्डन’ येथे ५,००० हून अधिक भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर ते ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन्स’ अंतर्गत संवाद साधणार आहेत. पण या दौऱ्याची बातमी येताच अमेरिकेत यावरून मोठे वादंग निर्माण झाला. एका बाजूला तेथील भारतीय Diaspora या कार्यक्रमासाठी आणि मोहन भागवत यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहे, तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेतील अनेक मानवाधिकार संघटना आणि न्यू यॉर्कच्या महापौरांनीही या दौऱ्यावर राजकीय आणि सामाजिक प्रश्न उपस्थित केलेयत. आजच्या या व्हिडिओंमध्ये आपण या दौऱ्याच्या आयोजकांची भूमिका काय आहे, मोहन भागवत यांच्या दौऱ्याला विरोध का होतोय, अमेरिकन सरकारची भूमिका आणि भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं यावर काय प्रत्युत्तर दिलंय हे सगळं समजून घेणार आहोत…