Headlines

Microsoft CEO Satya Nadella Salary; तुम्ही मंदी, AI च्या चर्चा करत राहा; मायक्रोसॉफ्टच्या सीओंनी उचलला 1 हजार कोटींचा पगार! एवढा पैसा आला कुठून?


Satya Nadella Salary : मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्यानडेला यांना 2014 मध्ये कंपनीची सूत्रे हाती घेतल्यापासून आतापर्यंतची सर्वात मोठी पगारवाढ दिल्ली गेली आहे. मूळच्या हैदराबादचे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांच्या नेतृत्वाखाली मायक्रोसॉफ्ट नवनवीन उंच यशाचे शिखर गाठत आहे ज्याचा थेट परिणाम त्यांच्या पगारावर झाल्याचं पाहायला मिळत आहे.

नडेला यांना 2025 मध्ये अंदाजे 96.5 दशलक्ष डॉलर्स अंदाज जवळपास 1 हजार कोटी रुपये पगारवाढ दिली गेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कंपनीने नडेला यांना पुरस्कृत केले.

Maharashtra TimesStock Crash: खटाखट परतावा देणारा शेअर धडाधड आपटला; 400 रुपयांवरून 12 रुपयांवर आला, गुंतवणूकदारांची पंचाईत

सत्य नडेला यांना बक्कळ पगारवाढीची भेट

यासह नडेला यांच्या पॅकेजमध्ये गेल्या वर्षाच्या 79.1 दशलक्ष डॉलर्सवरून 22 टक्के वाढ झाली. या काळात मायक्रोसॉफ्टने आकर्षक महसूल, परिचालन उत्पन्न आणि क्लाउडमधील वाढ नोंदवली तसेच, कंपनीच्या संचालक मंडळाने “AI मधील अपवादात्मक प्रगती”चा उल्लेख करत म्हटले की, नडेला यांच्या नेतृत्वाने पिढीजात तंत्रज्ञान बदलाच्या काळात मायक्रोसॉफ्टला आघाडी मिळवून दिली.

मार्केट फायलिंगमध्ये कंपनीने सांगितले की नडेला यांच्या नेतृत्वाखाली मायक्रोसॉफ्टने ‘पिढीजात तंत्रज्ञान स्थित्यंतरा’मध्ये स्वतःला वेगळे सिद्ध केले आणि एआयच्या जगात वेगाने उदयास आले. OpenAI मधील गुंतवणूक आणि Copilot यांसारख्या एआय सेवांच्या प्रारंभाने कंपनीला मजबूत स्थितीत पोहचवले आहे.

Maharashtra TimesGratuity Calculation: बेसिक सॅलरी, ग्रॉस की CTC, कोणत्या आधारावर बनते तुमची ग्रॅच्युइटी? 20 हजारांवर ग्रॅच्युटी कॅलक्युलेशन पाहा

सत्या नडेला यांच्या पॅकेजमध्ये काय

नडेला यांचे पॅकेज कंपनीचे प्राधान्यक्रम दर्शवते. 2025 च्या पॅकेजमध्ये 84 दशलक्ष डॉलर्सहून अधिक किमतीचे स्टॉक अवॉर्ड्स, 2.5 दशलक्ष डॉलर्सचा मूळ पगार आणि 9.5 दशलक्ष डॉलर्स कॅश बोनसचा समावेश होता. अशाप्रकारे, मायक्रोसॉफ्ट सीईओंच्या नियोजित वार्षिक रिवॉर्डपैकी 95% हून अधिक कामगिरीवर आधारित आणि त्यातील किमान 70% हिस्सा इक्विटीवर आधारित आहे.

त्याचवेळी, 2025 या आर्थिक वर्षात मायक्रोसॉफ्टचा महसूल 15 टक्क्यांनी वाढलं आणि ऑपरेटिंग इन्कममध्ये 17 टक्के वाढ झाली. तसेच क्लाउड महसूल 23% वाढून 169 अब्ज डॉलर्सच्या किंचित खाली पोहोचला, तर Azure चा महसूल 34% वाढीसह 75 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक झाला.

Maharashtra TimesRustomjee Crown: मुंबईत 50-50 कोटींच्या फ्लॅटवर बीएमसीचा हातोडा, तुमच्यावर ही वेळ येऊ नये; एक चूकही महाग पडू शकते2014 मध्ये सीईओ पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून सत्या नडेला यांच्या कार्यकाळात कंपनीचे बाजार भांडवल 300 अब्ज डॉलर्सवरून अंदाजे 3.65 लाख कोटीपर्यंत वाढले म्हणजे 1500 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळाला. अमेरिकेतील बड्या कंपन्यांमधील सीईओंचा सरासरी वार्षिक पगार सुमारे 17 दशलक्ष डॉलर्स असतो, म्हणजे नडेला यांना यापेक्षा जवळपास सहापट जास्त पगार मिळत आहे.

मात्र इतक्या मोठ्या रकमेमुळे सीईओ आणि सामान्य कर्मचाऱ्यांच्या पगारातील तफावत पुन्हा एकदा चर्चेत आली असून मायक्रोसॉफ्टचे सीईओ आणि सामान्य कर्मचाऱ्यांच्या पगारातील हा फरक अंदाजे 480 पट आहे. मात्र, नडेला यांच्या नेतृत्वाची दखल म्हणून पगारवाढ दिल्याचा कंपनीने दावा केला, ज्याने मायक्रोसॉफ्टला एआयच्या क्षेत्रात आघाडीवर नेले.