Headlines

शाब्बास रे पठ्ठ्या! वैभवचा बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही जलवा, बेबी बॉसच्या एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट


मुंबई : आपल्या तुफानी बॅटिंगने वैभव सूर्यवंशीने सर्वांना वेड लावले आहे. भारताकडून सर्वात कमी वयात पदार्पण करण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रम वैभवने मोडल होता. वैभवची बॅटिंग सर्वांनी पाहिलीच होती पण आता पठ्ठ्याने बॉलिंगमध्येही दमदार प्रदर्शन केले आहे. एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट घेत वैभवने छाप सोडली. दुलीप ट्रॉफीमध्ये ईस्ट झोन आणि नॉर्थ ईस्ट झोनमध्ये सामना सुरू आहे. या सामन्यामध्ये वैभवच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते पण त्याने मात्र निराशा केली. बॅटिंगमध्ये नाही पण पठ्ठ्याने बॉलिंगमध्ये कमाल करून दाखवली.

ईस्ट झोनकडून वैभव सूर्यवंशी सलामीला खेळण्यासाठी उतरला होता. वैभवने या सामन्यात ६ चेंडूत ८ धावा केल्या. त्याने केलेल्या ८ धावा या दौन चौकारांनीच केल्या होत्या. वैभव मोठी खेळी करू शकला नाही, मात्र ईस्ट झोन संघाने ६७ धावांचा मोठा डाव उभारला. सुदीप कुमारने १४६ धावांची शानदार खेळी केली, तर शहबाज अहमदने तब्बल १६७ धावा ठोकल्या होत्या. यानंतर फलंदाजीला आलेल्या नॉर्थ ईस्ट झोनचा पहिला डाव अवघ्या १११ धावांत आटोपला आणि संघावर फॉलोऑनची वेळ आली.

दुसऱ्या डावातही संघ अडचणीत असताना कर्णधार ईशान किशनने वैभव सूर्यवंशीकडे चेंडू सोपवला. वैभवनेही कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत सलग चार चेंडूंत दोन विकेट्स घेतल्या. त्याने किशन लिंगदोह आणि इमलीवती लेमटूर यांना बाद केले. वैभवने ३ षटकांत केवळ ११ धावा देत २ विकेट्स घेतल्या. त्यामुळे फलंदाजीत अपयशी ठरलेल्या वैभवने गोलंदाजीत मात्र शानदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

ईस्ट झोन प्लेइंग ११ : ईशान किशन (C&W), वैभव सूर्यवंशी (VC), अभिमन्यु ईश्वरन, कुमार कुशाग्र (WK), सुदीप कुमार, विराट सिंह, अनुकूल रॉय, शाहबाज अहमद, मोहम्मद शमी, मुकेश कुमार, अभिजित सरकार

नॉर्थ ईस्ट झोन प्लेइंग ११ : रोंगसेन जोनाथन (C), किशन लिंगडोह, आशिष थापा (WK), अर्पित भटेवरा, कंगाबम प्रियोजित सिंग, जोसेफ लालथनखुमा, फेरोइजाम जोतिन सिंग, आकाश चौधरी, इमलीवाती लेमतूर, बिस्वरजित कोनथौजम, तेची नेरी

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत