- Marathi News
- International
- New Formula; Iran Also Invited In Pak Saudi Turkey Agreement, Pakistan Army Chief Munir Leaves For Tehran
वॉशिंग्टन/नवी दिल्ली4 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान एक नवा फॉर्म्युला समोर आला. पाकिस्तान-सौदी अरेबिया-तुर्किये यांच्यातील ‘मक्का पॅक्ट’ या संरक्षण करारात सामील होण्यासाठी इराणलाही निमंत्रण मिळाले आहे. इराणी संसदेचे प्रमुख मेहदी रहिमी यांनी याला दुजोरा देत सांगितले की, मक्का करारात सामील होण्याबाबत विचार सुरू आहे.
दुसरीकडे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई म्हणाले, प्रादेशिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चेसाठी बॅकडोअर चॅनेल्सवरून काही प्रस्ताव नक्कीच आले. दरम्यान, पाक लष्करप्रमुख असीम मुनीर सोमवारी तेहरानला रवाना झाले. सूत्रांनुसार मुनीर अंतिम करारावर चर्चा करतील.
मक्का पॅक्ट
७ ऑगस्ट रोजी मक्का पॅक्ट झाला. यानुसार, सदस्य देशावर झालेला हल्ला तिन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल. सौदीकडे पैसे तर पाकिस्तान अण्वस्त्रसंपन्न आहे.
३ देशांचा संरक्षण करार कागदावरच, इराण जोडला गेल्यास तो अपयशी ठरेल
घडामोडींचा अन्वयार्थ काय ? पाक-तुर्किये-सौदी यांचा संरक्षण करार आधीपासूनच कागदावर आहे. तो प्रत्यक्षात आणण्यात अडथळे आहेत. पाक व अफगाण सीमेवर लष्करी चकमक होऊनही सौदीने पाकिस्तानची साथ दिली नाही.
इराण आल्याने काय बदलेल? इराणही यात सामील झाला तर पश्चिम आशियात वेगळेच चित्र समोर येईल. सध्या प. आशियात इराण व इस्रायल हे मोठे खेळाडू आहेत. ट्रम्प इराणला सामील करून घेण्यात खोडा घालतील. इराण आल्श्सय पॅक्टचे तोंडघशी पडणे निश्चित.
भारतासाठी किती महत्त्वाचे? प. आशियातील सर्व देशांत भारताची स्थिती मजबूत आहे. तुर्किये व पाक भारतविरोधात स्वतःच्या पातळीवर काही करू शकत नाहीत. भारतासोबत आर्थिक संबंधांने सौदी आपलीच बाजू घेईल. या पॅक्टमुळे भारताला कोणताही धोका नाही.
बांगलादेश इच्छुक का? बांगलादेश केवळ वक्तव्ये करण्यातच व्यग्र आहे. बांगलादेशचे नवे सरकार आपले पर्याय शोधत आहे. या पॅक्टमध्ये सामील असलेले देश बांगलादेशला सामावून घेण्यापूर्वी आपल्या फायद्यांचा विचार करतील. बांगलादेश स्वतःहून या करारात सामील होण्याचा प्रयत्न करत आहे.
