Rupali chakankar complaint against 19 people in pune including shiv sena sushma adhare and other prominent figures; रुपाली चाकणकरांच्या तक्रारीनंतर पुण्यात १९ जणांवर गुन्हा दाखल; अंधारे, ठोंबरेंसह अनेक मोठ्या चेहऱ्यांचा समावेश
Rupali chakankar complaint against 19 people in pune including shiv sena sushma adhare and other prominent figures; रुपाली चाकणकरांच्या तक्रारीनंतर पुण्यात १९ जणांवर गुन्हा दाखल; अंधारे, ठोंबरेंसह अनेक मोठ्या चेहऱ्यांचा समावेश
पुणे : राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांनी तब्बल १९ जणांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ही पावले उचलली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
या कारवाईमध्ये अनेक राजकीय कार्यकर्ते आणि प्रसिद्ध चेहऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये विशेषतः शिवसेनेच्या (ubt) सुषमा अंधारे , राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे , अभिनेत्री दिपाली सय्यद, सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी, डॉ. आशा मिरगे, हनुमंत गलगटे आणि वर्षा कांबळे यांच्यावर गुन्हा नोंदविला आहे. तर राष्ट्रवादी (शरद पवार गट) सोशल मीडिया सेलचे योगेश सावंत, मोहसीन शेख तसेच महादेव बालगुडे यांचे देखील नाव FIR मध्ये आहेत.
फिर्यादीत नमूद केलेल्या माहितीनुसार, नाशिकस्थित ईशान्येश्वर महादेव मंदिर ट्रस्टचा प्रमुख भोंदू अशोक खरात याच्याशी रुपाली चाकणकर यांची ओळख एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान झाली होती. त्या धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने तेथे उपस्थित राहिल्या होत्या. दरम्यान, खरात याला अटक झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर, त्याच्यासोबतचे जुने छायाचित्र आणि व्हिडिओ इंटरनेटवर जाणीवपूर्वक प्रसारित करून खोटे व बिनबुडाचे आरोप केले जाऊ लागले. विविध डिजिटल व्यासपीठांवरून (फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब) बदनामीकारक मजकूर, शिवीगाळ आणि धमक्या दिल्याचा दावा चाकणकर यांनी केला आहे. तसेच कमेंट्सच्या माध्यमातून अश्लील भाषा वापरून लैंगिक छळवणूक व मानहानी केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या संदर्भातील सर्व डिजिटल पुरावे व स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे सोपवण्यात आले असून, पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून पुढील चौकशी हाती घेतली आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा