Headlines

Bangladesh Tragedy ; बांगलादेशात अख्खं हिंदू कुटुंब संपवलं, त्याच घरात अंघोळ केली; पोलीस तपासात संपूर्ण घटनेला वेगळंच वळण


Bangladesh Hindu Family Murder: बांगलादेश येथील रंगपूर मध्ये संपूर्ण कुटुंबाची हत्या झाल्याचे समोर आले आहे. आरोपी मृतकाच्या घराच्या छतावर चढून अमली पदार्थाचे सेवन करत होते. मृतक गणपती चक्रवर्ती हे छतावर जाऊन जाब विचारताच आरोपींनी त्यांची हत्या केली. त्यांनतर त्यांच्या पत्नीची आणि त्यांच्या मुलीची आणि मुलाची हत्या केली. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई करत आहे.

Rangpur Hindu Family Murder Case
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ढाका: एक अशी घटना समोर आली आहे ज्यामुळे संपूर्ण बांग्लादेश हादरून गेला आहे. एकाच घरातील चार जणांची हत्या झाल्याचे समोर आले आहेत. आरोपी हत्या केल्यांनतर तिथून पळून गेले नाहीत तर त्यांनी तिथे अख्खी रात्र घालवली. तिथे त्यांनी अंघोळ केली, जेवण केलं आणि ड्रग्स घेतले. एवढेच नाही तर त्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी मृतकांचा मोबाईल फोन डिटर्जेंटच्या पाण्यात बुडवून ठेवले. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी ही घटना दरोडा असल्याचा भासवण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र त्यांचा हा डाव फसला. आरोपींनी संपूर्ण कुटुंबाची हत्या का केली? यामागचं कारण समोर आलं असून संपूर्ण घटनाक्रम देखील समोर आली आहे. पोलिसांनी कारवाई करत दोन चुलत भावांना अटक केली आहे.

कशी समोर आली घटना?

घडलेली घटना बांग्लादेश येथील रंगपूर शहर येथे गुरुवारी (२० ऑगस्ट) घडली. सिद्धार्थ दास (२३ वर्ष) आणि मुग्धा दास (१९ वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. तर निवृत्त शिक्षक गणपती चक्रवर्ती (65), पत्नी प्रीतिलता चक्रवर्ती (50), मुलगी अगामी चक्रवर्ती प्रार्थी (23) आणि मुलगा प्रियम चक्रवर्ती (12) असे हत्या झालेल्या व्यक्तींचे नावे आहेत. मृतकाच्या घराचा मेन गेट बंद होता. नातेवाईकांनी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे नातेवाईकांनी पोलिसांना याबाबतीत कळवले. तेव्हा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता घरात चार शव आढळून आले. चारही शव हत्येच्या २ दिवसानंतर म्हणजे २२ ऑगस्टला उशिरा रात्री सापडले.

कशी केली हत्या?

आरोपी हे शेजाऱ्यांच्या बिल्डिंगवरून गणपती चक्रवर्ती यांच्या घराच्या छतावर चढले. तिथे आरोपी हे अमली पदार्थचे (याबा) सेवन करत होते. गणपती चक्रवर्ती यांना संशयास्पद आवाज आल्याने वर गेले आणि त्यांना विचारपूस करत जाब विचारला. तेव्हा आरोपींनी ओळख लपवण्याचा आणि पकडले जाण्याच्या भीतीने दुपट्ट्याच्या मदतीने त्यांचा गळा आवळून हत्या केली. त्यांनतर त्यांची पत्नी देखील वर गेली असता त्यांचाही गळा आवळून हत्या केली. आरडाओरडा ऐकून त्यांची मुलगी आणि मुलगा हे देखील वर जाण्यासाठी धावले तेव्हा त्यांची देखील हत्या करण्यात आली.

हत्येनंतर त्याच घरात घालवली संपूर्ण रात्र

हत्या केल्यांनतर आरोपी पळून गेले नाहीत तर त्यांनी त्या घरात संपूर्ण रात्र घालवली. पोलिसांचा दावा आहे की, त्यांनी तिथे अंघोळ केली, जेवणाच्या टेबलवर ठेवलेले खजूर खाल्ले आणि जेवण सुद्धा केले. त्यांनतर त्यांनी तिथे अमली पदार्थाचा सेवन केलं. एवढेच नाही तर त्यांनी मृतकाच्या मोबाइल फोन मधून ओळख लपवण्यासाठी मोबाईल फोन डिटर्जेंटच्या पाण्यात बुडवून ठेवले.

पोलिसांचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न

आरोपींचा नशा उतरल्यानंतर आरोपींनी घरातील सामान अस्ताव्यस्त केला. जेणेकरून या प्रकरणाला दरोड्याचा रूप देण्यात येईल. मात्र त्यांनाच हा डाव फसला. आरोपींनी दागिने देखील घरा जवळच्या एका मंदिराच्या मागे सुनसान परिसरात लपवून ठेवले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींची चौकशी करत लपवलेले दागिने जप्त केले आहेत. आरोपी दोघे हे चुलत भाऊ आहेत.

Maharashtra Times3 महिन्यांची गर्भवती, संरक्षण मंत्रालयात अधिकारी; तरुणीचा आकस्मिक अंत, सासरचे गोत्यात

आरोपीच्या भावाचा मित्र प्रियम

मृतक प्रियम हा आरोपींपैकी एकाच्या छोट्या भावाचा मित्र होता. त्यामुळे आरोपींना त्यांची ओळख समोर येईल अशी भीती होती आणि त्यांनी ही हत्या घडवून आणली. गणपती चक्रवर्ती हे गेल्या वर्षी रंगपूर शाळेतून निवृत्त झालेले शिक्षक होते. तर त्यांच्या मुलीने इंग्रजीत मास्टरची पदवी घेतली होती, मुलगा प्रियम हा जिल्हा शाळेत पाचवीच्या वर्गात शिकत होता. या हिंदू कुटुंबियांच्या हत्येनंतर बांगलादेशमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस पुढील चौकशी करत असून कारवाई सुरु आहे.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा