Entrepreneur Success Story: एका गंभीर आजाराचे निदान झाल्यावर लिली चेन बौद्ध भिक्षुणी बनली. मग, दुसऱ्या एका भिक्षूच्या सल्ल्यानुसार आपला मार्ग बदलला आणि मेटा येथे अभियंता बनली. त्यानंतर, लिलीने स्वतःचा स्टार्टअप सुरू केला, ज्याचे मूल्य आज कोट्यवधी डॉलर्समध्ये आहे.

239 कोटींची कंपनी उभारली
FSH टेक्नॉलॉजीजने आतापर्यंत एकूण 2.5 कोटी डॉलर्स किंवा अंदाजे 239 कोटी रुपये निधी उभारला असून अलीकडील 2 कोटी डॉलर्सची ‘सीरीज ए’ निधी उभारणी फेरी, फिग्मा, नोशन, रॅम्प आणि लॅटिस यांसारख्या कंपन्यांमधील सुरुवातीच्या गुंतवणूकदारांपैकी लॅची ग्रूम यांच्या नेतृत्वाखाली झाली. तसेच याआधी कंपनीने कॉन्ट्रेरी आणि अक्रू यांच्या नेतृत्वाखाली जनरल कॅटॅलिस्ट, स्क्रिबली आणि बेसिस सेट व्हेंचर्स यांच्या सहभागाने 50 लाख डॉलर्सचा सीड राऊंड उभारला होता. (प्रातिनिधिक फोटो)
16 व्या वर्षी बौद्ध भिक्षू बनलेल्या
वयाच्या 16 व्या वर्षी लिली चेन हायस्कूल ड्रॉपआउट झाल्या. त्यानंतर ग्रेव्हज डिसीज, एक स्वयंप्रतिरोधक रोग असल्याचे निदान झाले. लिलीचे कुटुंब सार्वजनिक आरोग्य विम्यावर अवलंबून होते आणि त्यांना चांगल्या प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा अभाव होता. लिलीच्या आई नेहमीच आध्यात्मिक होत्या आणि लिलीनेही भिक्षुणी व्हावे, असे त्यांनीच सुचवले. अशाप्रकारे, चेनने अमेरिकेत दीक्षा घेतली आणि त्यानंतर आपल्या आईसोबत ग्रामीण चीनमधील बौद्ध मठात राहायला गेली.
ऐकण्याची कला आत्मसात केली
चेन यांनी सुमारे दोन वर्षे भिक्षू म्हणून दीक्षा घेतली, ज्यामध्ये चीनमधील एका मठात तब्बल सहा महिने राहिल्या. तिथलं राहणीमागं अगदी साधं होतं. भिक्षू ध्यान करण्यासाठी, शेती करणे, साफसफाई करणे, पाणी भरणे, आणि इतर घरगुती कामे करण्यासाठी पहाटे 3 वाजता उठायचे. तिथं वीजही नव्हती. लिली सांगतात की आपल्या समस्या सांगण्यासाठी लोक मठात भेट द्यायचे पण, भिक्षू नेहमीच उपाय नाही सुचवायचे, तर फक्त ऐकून घ्यायचे.
एका भिक्षूने महाविद्यालयात जायला प्रोत्साहित केले
मठात राहताना चेन आपला बहुतेक वेळ वाचनात घालवायच्या. अखेरीस मठातील प्रमुख भिक्षूच्या लक्षात आले त्यांनी ‘तुला शिकायला आवडते का?’ असं विचारले. चेनने त्यांना सांगितले की अमेरिकेत सार्वजनिक ग्रंथालये सर्वात जास्त आठवतात, तेव्हा त्यांनी लिलीला अमेरिकेत परत जाऊन पुढील शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. (प्रातिनिधिक फोटो)
अमेरिकेत परतणं सोपं नव्हतं
पण लिलीला अमेरिकेत परतणं सोपं नव्हतं. चेनकडे हायस्कूल डिप्लोमा नव्हता आणि कॉलेज प्रवेश प्रक्रियेबद्दल काहीच कल्पना नव्हती. सुरुवातीला GED मिळवून कम्युनिटी कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन नंतर दुसऱ्या कॉलेजमध्ये जायचा त्यांचा प्लॅन होता, पण कॉलेज फेअरमधील एका भेटीमुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
कोलोरॅडो कॉलेजमध्ये एन्ट्री
चेन स्थानिक कम्युनिटी कॉलेजच्या शोधात सार्वजनिक ग्रंथालयात आयोजित कॉलेज फेअरमध्ये गेली. इथं त्यांना ‘CC’ असं लेबल लावलेलं टेबल दिसलं आणि ‘कम्युनिटी कॉलेज’ असा अर्थ समजून तिथे थांबल्या. CC प्रत्यक्षात कोलोरॅडो कॉलेज, एक छोटे लिबरल आर्ट्स स्कूल होते. या अनोख्या प्रवासाबद्दल कळल्यावर टेबलवरील एका महिलेने चेनला ACT परीक्षा देऊन स्कोर ई-मेल करण्यास सांगितले. चेनला 36 गुण मिळाले, जो सर्वोच्च संभाव्य स्कोर होता.
त्या महिलेने चेनला ‘अर्ली डिसिजन’ अंतर्गत कोलोरॅडो कॉलेजमध्ये अर्ज करण्यास प्रोत्साहित केले. चेनने विचारले की ती हायस्कूल डिप्लोमाशिवाय अर्ज करू शकते का, तेव्हा तिला तिचे परीक्षेचे गुण सादर करण्यास आणि अनुभवाबद्दल एका वैयक्तिक निबंधात लिहिण्यास सांगितले गेले. अशाप्रकारे, चेनला प्रवेश मिळाला.
स्वतः कोडिंग शिकून मेटामध्ये रुजू
चेनने कॉलेजमध्ये असताना स्वतःहून कोडिंग शिकून घेतले. पदवी घेतल्यानंतर मार्क झुकरबर्गच्या मेटा येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून रुजू झाल्या. मात्र, लवकरच चेनला नोकरीचा कंटाळा आला आणि एका वर्षानंतर FSH टेक्नॉलॉजीज सुरू केली. सरकारी टेक्नोलॉजीबाबत कंपनीच्या दृष्टिकोनावर चेनने मठात शिकलेल्या गोष्टींचा अजूनही प्रभाव आहे.
लिली चेनची कंपनी करते काय
एफएसएच टेक्नॉलॉजीज शहरांत, शाळा जिल्हे आणि सरकारी संस्थांसाठी सॉफ्टवेअर विकसित करते, ज्यामध्ये मंद आणि कालबाह्य झालेल्या सरकारी तंत्रज्ञान प्रणाली बदलण्यावर कंपनीचा भर देते. ही कंपनी सरकारी कंत्राटांसाठी मोठ्या सल्लागार कंपन्यांशी स्पर्धा देखील करते आणि ॲक्सेंचरला अनेकदा आपला मुख्य प्रतिस्पर्धी मानले जाते. (प्रातिनिधिक फोटो)
कंपनीचे व्यवसाय मॉडेल काय
एफएसएचचे व्यवसाय मॉडेल पारंपरिक सल्लागार कंपन्यांपेक्षा वेगळे असल्याचे चेन म्हणतात. कंपनी सल्लामसलतीच्या तासांसाठी शुल्क आकारत नाही, तसेच समर्पित विक्री प्रतिनिधी किंवा सल्लागारही नाही. त्यांनी म्हटले की, “सर्वात मोठ्या फरकांपैकी म्हणजे आमची प्रोत्साहन योजना. आम्ही सल्लामसलतीच्या तासांसाठी शुल्क आकारत नाही आणि आमच्याकडे समर्पित विक्री प्रतिनिधी किंवा सल्लागारही नाही. एफएसएचमधील प्रत्येकजण एक ‘निर्माता’ आहे.” मोठ्या कंपन्यांशी यशस्वी स्पर्धा करूनही सरकारी संस्था ॲक्सचेंजर यांसारख्या प्रस्थापित नावांची निवड का करत राहतात हे आपल्याला समजते, असे चेन म्हणाले.

