तर, मुंढे साहेब आपल्याला या पत्राद्वारे विनंती करायची आहे ती अशी की, वृत्तपत्रे तसेच इतर ठिकाणी येणाऱ्या मराठी साहित्यावरील परीक्षणांचीही छाननी तुम्ही आता हाती घ्या. हॉटेलांवर कसे छापे मारता तसेच छापे वृत्तपत्र कार्यालयांवरही टाका.
तुकाराम मुंढे कारवाई(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
आदरणीय श्री. तुकाराम मुंढे साहेब,
स.न.वि.वि.
आपण अन्न व औषध प्रशासनाच्या म्हणजेच ‘एफडीए’च्या आयुक्तपदी आलात त्यास तीन महिन्यांचा काळ लोटला. तुमच्यासाठी एकाच पदावर तीन महिने कायम राहणे म्हणजे… अबब! आम्ही सामान्यजन तर तुमच्या नियुक्तीची बातमी वृत्तपत्रात वाचली रे वाचली की त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमच्या बदलीची बातमी वृत्तपत्रात शोधतो!
मुंढे साहेब, आपण सोशल मीडियावर किती वावरता ते ठाऊक नाही. आम्ही कवी असल्याने तेथे खूपदा वावरत असतो. सोशल मीडियावर सध्या एक विषय चांगलाच गाजतो आहे. ‘आमचे येथे अल्पशा मोबदल्यात मराठी साहित्यावरील परीक्षण लिहून मिळेल’, अशी थेट जाहिरातच सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्याने कोण खळबळ उडाली म्हणता. या अशा गोष्टी का जाहीर बोलायच्या आणि करायच्या असतात? मराठी साहित्याचा, साहित्यिकांचा नि समीक्षकांचाही केवढा हा घोर अपमान. आमच्याही कवीमनाला त्याने फार फार वेदना झाल्या. त्या वेदनेत आम्ही एक कविताही लिहून टाकली.
तर, मुंढे साहेब आपल्याला या पत्राद्वारे विनंती करायची आहे ती अशी की, वृत्तपत्रे तसेच इतर ठिकाणी येणाऱ्या मराठी साहित्यावरील परीक्षणांचीही छाननी तुम्ही आता हाती घ्या. हॉटेलांवर कसे छापे मारता तसेच छापे वृत्तपत्र कार्यालयांवरही टाका. तिथल्या परीक्षणांच्या साठ्याची तपासणी करा. त्या परीक्षणांमध्ये अस्सल किती, भेसळ किती ते शोधून काढा. त्या परीक्षणांमध्ये भेसळ आढळली तर दंड करा परीक्षण लिहिणाऱ्यांना आणि ते साहित्य लिहिणाऱ्यांनाही. दंड म्हणून एकवेळ पैसे भरायला नाही सांगितले तरी चालेल, पण त्या लिहिणाऱ्यांना महिनाभर लिहिण्यास बंदी घाला.
आणखी एक साहेब, तुमच्या पथकात साहित्यात रुची असणारा कुणी आहे का? असेल तर ठीक. पण नसेल तर माझी तयारी आहे त्या पथकात सहभागी होण्याची. तेव्हा कृपया विचार करा.
कळावे. तुमच्या उत्तराची वाट बघणारा…
– चकोर
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा