Headlines

व्यायामशाळेत भेटायला ये..! द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या प्रशिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुंबईमधील विलेपार्लेमधील धक्कादायक घटना


Coach Rajendra Devrukhkar News : मुंबईतील विलेपार्ले येथे गुरू शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आलीय. द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या प्रशिक्षकाने अल्पवयीन मुलीवर व्यायामशाळेत बोलावत अत्याचार केला आहे. व्हाट्सअपला मेसेज करत बोलावून घेतलं, मुलगी घाबरलेली पण पीटी टीचरमुळे सर्व प्रकार समोर आला.

coach Rajendra Devrukhkar Vile Parle
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. द्रोणाचार्य पुरस्कार विजेता मल्लखांब प्रशिक्षक दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला. मुलीने पीटी टीचरला सर्व प्रकार सांगितला, त्यानंतर ही समोर आली असून आरोपी ४६ वर्षीय प्रशिक्षक राजेंद्र देवरूखकर याला पोलिसांनी अटक केली. प्रशिक्षकावर पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नेमका काय आहे प्रकरण जाणून घ्या.

नेमकं प्रकरण काय?

मुंबईमधील विलेपार्लेमधील व्यायामशाळेत राजेंद्र देवरूखकर हा प्रशिक्षण देत आहे. २०२३ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते द्रोणाचार्य पुरस्काने त्याला गौरवण्यात आलं होतं. मात्र राजेंद्रची नियत फिरली, पीडित मुलगी अभ्यासामुळे मल्लखांब सरावासाठी जात नव्हती. शुक्रवारी सकाळी प्रशिक्षक राजेंद्र देवरूखकर याने तिला व्हाट्सअॅपवर ‘Hi’ मेजेस केला.

Maharashtra TimesImran Khan News : इम्रान खानसाठी गावसकर-कपिल देव यांच्यासह 21 माजी कर्णधार एकवटले; पाकिस्तानच्या पीएमना पाठवलं 3 मागण्यांचं पत्र, कारण काय?
पीडितेनेही सरांचा मेसेज आला आहे म्हणून रिप्लाय केला आणि याबाबद्दल आईच्याही कानावर घातलं. तु कुठे आहेस? जर फ्री असशील तर मला व्यायामशाळेत भेटायला ये असं प्रशिक्षक राजेंद्र देवरूखकर म्हणाला. पीडित सकाळी वाजताच्या सुमारास व्यायामशाळेत सरांना भेटायला गेली. तिने विचारही केला नव्हता की ती ज्यांना भेटायला जाते आहे तो सर नाहीतर नराधम होता. शूज काढल्यावर पीडितेला ते आतमध्ये ठेव असे सांगितले. यादरम्यान त्याने दाराची कडी लावली आणि जबरदस्ती करू लागला. सुरूवातीला त्याने पीडितेची विचारपूस केली. त्यानंतर जबरदस्तीने तिलाा मिठी मारून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ती तिथून निघून जात होती.

Maharashtra TimesRavindra Jadeja : नेमका काय विषय झाला! बॉल लागल्यावरही मैदान न सोडता खेळणारा रविंद्र जडेजा असा कसा आऊट झाला? Video व्हायरल
पीडित नकार देत असल्याने त्याने शेवटी जाता-जाता तिला आज जे झालं ते आपल्यातच राहुदे, असं म्हटल्याचं तक्रारीमध्ये म्हटलं आहे. या सर्व प्रकाराने ती घाबरून गेली होती, घरी आल्यावर ती काहीच बोलली नाही. कॉलेमध्ये गेल्यावर तिने हा प्रकार मैत्रिणीला सांगितला. मैत्रिणीने विश्वासात घेतल्यावर त्या पीटीच्या सरांकडे गेल्या. त्यानंतर पीटी सरांच्या मदतीने अल्पवयीन पीडितेने विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

Maharashtra TimesImran Khan News : इम्रान खानसाठी गावसकर-कपिल देव यांच्यासह 21 माजी कर्णधार एकवटले; पाकिस्तानच्या पीएमना पाठवलं 3 मागण्यांचं पत्र, कारण काय?
दरम्यान, गुरु-शिष्याचे नाते हे विश्वास, संस्कार आणि आदरावर आधारलेले पवित्र नाते असतं. या नात्याचा गैरफायदा घेणे, विश्वासघात करणे किंवा स्वार्थासाठी त्याचा वापर करणे ही अत्यंत चुकीचं आहे. आई-वडिलांंनंतर सर्वा जास्त विश्वास हा गुरूवर असतो. पण अशा कृत्यांमुळे केवळ व्यक्तींचे नव्हे, तर समाजातील या पवित्र नात्याच्या मूल्यांचेही नुकसान होते.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा