Headlines

New York Stanley Avenue 27 Year Old Indian Youth Gurdeep Singh Killed; क्षुल्लक कारणावरुन वाद, अज्ञाताकडून छातीवर गोळीबार; अमेरिकेत भारतीय तरुणाला संपवलं


Indian Youth Gurdip Singh Murder in New York : एका भारतीय तरुणाची अमेरिकेत अज्ञात हल्लेखोराने गोळ्या झाडून हत्या केली आहे. एका २७ वर्षीय गुरदीप सिंह असं या तरुणाचं नाव आहे.

Indian Youth Gurdip Singh Murder in New York
भारतीय तरुण गुरदीप सिंह हत्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
वृतसंस्था, न्यूयॉर्क : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात झालेल्या वादानंतर एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार करून २७ वर्षीय भारतीय नागरिक गुरदीप सिंह याची हत्या केली. शुक्रवारी रात्री सुमारे १० वाजता ईस्ट न्यूयॉर्क परिसरातील स्टॅन्ली अव्हेन्यूजवळ ही घटना घडली. हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाला.

उपचारांपूर्वीच मृत घोषित

‘क्वीन्स येथे राहणाऱ्या गुरदीपवर छातीत गोळीझाडण्यात आली होती. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा तो गंभीर जखमी अवस्थेत आढळला. आपत्कालीन पथकाने त्याला रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारांपूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले’, अशी माहिती ‘सीबीएस न्यूज’ने दिली. या घटनेसंबंधी सीसीटीव्ही चित्रणात दोन व्यक्तींमध्ये रस्त्यावर झटापट होताना दिसत आहे. त्यानंतर प्रकाशाची एक चमक दिसते. ती गोळीबाराची असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर एक व्यक्ती जमिनीवर कोसळते, तर दुसरी व्यक्ती मोटारीत बसून तेथून निघून जाते. पोलिसांनी शनिवारी सकाळपर्यंत परिसरात शोधमोहीम राबवून पुरावे गोळा केले. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. हत्येचा सखोल तपास आता सुरू आहे.

Maharashtra Timesसमुद्रात दहशत! 22 भारतीयांचं अपहरण; सागरी लुटारूंकडून 2 जहाजं हायजॅक; भारताचं टेन्शन वाढलं

ओमानमध्ये अपघातात भारतीयाचा मृत्यू

ओमानमध्ये रस्त्यावरून वाहन घसरून उलटल्याने झालेल्या अपघातातएका भारतीयाचा मृत्यूझाला, तर नऊ जण जखमी झाले. सुलतान सईद बिन तैमूर मार्गावर शनिवारी हा अपघात झाला. जखमी सर्वजण भारतीय नागरिक असल्याची माहिती ओमान पोलिसांनी दिली. वाहन रस्त्यावरून घसरल्यानंतर हा अपघात झाला. जखमींपैकी दोघांना अल हिमा प्रांतातून निझवा रुग्णालयात नेण्यासाठी ओमान पोलिसांच्या हवाई पथकाने विशेष मोहीम राबवली. उर्वरित जखमींनाही रुग्णवाहिकांमधून निझवा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

भल्यापहाटे 22 जणांचा जागीच करुण अंत

गिनीची राजधानी कोनाक्रीमध्ये एक भीषण मोठी दुर्घटना घटना घडली आहे. झोपड्यांवर कचऱ्याचा डोंगर कोसळल्याने ही दुर्घटना घडली असल्याचं समोर आलं आहे. या दुर्घटनेत 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दार एस सलाम इथे ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाल्याची माहिती देखील मिळत आहे. बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.

Maharashtra TimesFlight Accident Averted: टेकऑफवेळी विमानाचं शेपूट आदळलं; 2 तास हवेत इंधन सांडवलं, 4 टायर फुटले; 287 जणांचा जीव टांगणीला

रहिवाशांना परिसर रिकामा करण्याच्या नोटिसा आधीच दिलेल्या

गिनीच्या नागरी संरक्षण सेवेच्या प्राथमिक आकडेवारीनुसार यादुर्घटनेत आतापर्यंत किमान 22 जणांचा मृत्यू झाला आहे. काल रविवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास कोनाक्रीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे हे भूस्खलन झालं आहे. ज्यामुळे कचऱ्याचा डोंगर ओसंडून वाहू लागला आणि कचऱ्याच्या डोंगराच्या आजूबाजूच्या झोपड्या गाडल्या गेल्या. घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्या डोंगराजवळ राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांना परिसर रिकामा करण्याच्या नोटिसा आधीच बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर अनेकांनी आपली घरे सोडून इतरत्र पलायन केलं होतं. मात्र, काही लोक अद्यापही तिथेच राहत होते.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा