Headlines

Yashasvi Jaiswal Controversy : यशस्वीला राग महागात पडणार? लाइफटाइम बॅनचा धोका, पण टीम इंडियाच्या कोचकडून बचाव, काय म्हणाले?


Yashasvi Jaiswal Ban : भारत-श्रीलंका दुसऱ्या कसोटीत यशस्वी जैस्वाल आणि असिथा फर्नांडो यांच्यात वाद झाला. या प्रकाराची गंभीर दखल घेतली गेल्यास जैस्वालवर मोठी कारवाई होऊ शकते.

India vs SL Second Test Coach Sitanshu Kotak
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी एक अत्यंत धक्कादायक आणि भयंकर वाद चव्हाट्यावर आला आहे. टीम इंडियाचा आक्रमक युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो यांच्यात भर मैदानात जोरदार राडा झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात यशस्वीने थेट विरोधी खेळाडूला डोक्याने धडक देण्याचा प्रयत्न केला. यशस्वीच्या या भयंकर चुकीमुळे आता त्याच्या संपूर्ण करिअरवरच टांगती तलवार निर्माण झाली आहे.

नेमकं मैदानात काय घडलं?

पहिल्या सत्राचा खेळ संपण्यापूर्वी असिथा फर्नांडोने यशस्वी जैस्वालला ४५ धावांवर बाद करत त्याचे अर्धशतक हुकवले. विकेट मिळाल्यानंतर फर्नांडो आपल्या सहकाऱ्यांसोबत जल्लोष करत होता आणि त्याने यशस्वीला उद्देशून काहीतरी डिवचणारे शब्द वापरले. हे ऐकताच पॅव्हेलियनकडे परतणारा यशस्वी अचानक माघारी फिरला आणि अत्यंत आक्रमकपणे फर्नांडोच्या अंगावर धावून गेला.

Maharashtra TimesVaibhav Sooryavanshi Wicket : वैभवला ८ धावांतच गार केलं, बॉक्सिंगमध्ये गोल्ड जिंकणारा हा गोलंदाज आहे तरी कोण? क्रिकेटमध्ये एन्ट्रीची भन्नाट कहाणी!
प्रकरण इतके तापले की दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ आले आणि त्यावेळी यशस्वीने फर्नांडोला थेट डोक्याने धडक देण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट दिसले. अखेर नॉन-स्ट्रायकर एंडला उभा असलेला देवदत्त पडिक्कल आणि मैदानावरील पंचांनी मध्यस्थी करत दोघांना वेगळे केले आणि पुढील अनर्थ टळला.

प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी केली पाठराखण

दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करत यशस्वीचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. “हा सर्व प्रकार ‘हीट ऑफ द मोमेंट’ मध्ये घडला. श्रीलंकन खेळाडूंनी यशस्वीला डिवचल्यामुळेच ही घटना घडली. मात्र, असे असले तरी यशस्वीने विरोधी गोलंदाजाच्या इतक्या जवळ जायला नको होते, हे देखील तितकेच खरे आहे,” अशी कबुली कोटक यांनी दिली.

लेव्हल-4 चे उल्लंघन अन् करिअरवर टांगती तलवार!

यशस्वीची ही हिंसक वागणूक त्याच्या क्रिकेट करिअरसाठी मोठी भयंकर अडचण ठरू शकते. जर सामनाधिकाऱ्यांनी हा प्रकार ‘एमसीसी आचारसंहिते’चे ( MCC Code of Conduct ) अत्यंत गंभीर उल्लंघन म्हणजेच ‘लेव्हल-४’ (Level-4 Offense) चा अपराध मानला, तर यशस्वीवर कडक कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो. या नियमांतर्गत दोषी आढळल्यास खेळाडूवर ५ कसोटी सामने, १० वनडे सामने किंवा थेट ‘आजीवन बंदी‘ (Lifetime Ban) लागण्याची तरतूद आहे. त्यामुळे आता आयसीसी काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra TimesInd vs Sl 2nd Test : भारत-श्रीलंका दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवसच ठरणार टर्निंग पॉइंट, श्रीलंकेच्या खेळाडूंकडून 2 मोठ्या चुका; भारताने उभारला 300 धावांचा डोंगर

दुलीप ट्रॉफीतही राहणेने काढले होते मैदानाबाहेर!

२४ वर्षीय यशस्वी जैस्वाल मैदानावर आपल्या रागामुळे चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०२२ च्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेदरम्यान वेस्ट झोनकडून खेळताना यशस्वी साऊथ झोनचा खेळाडू टी. रवी तेजा याच्याशी असाच भिडला होता. पंचांनी वारंवार ताकीद देऊनही यशस्वी ऐकत नव्हता. त्यावेळी वेस्ट झोनचा कर्णधार अजिंक्य रहाणेने अत्यंत कठोर पाऊल उचलत शिस्तभंगाच्या कारवाईअंतर्गत यशस्वीला थेट मैदानाबाहेर काढले होते. आता पुन्हा एकदा त्याच्या याच रागामुळे टीम इंडियाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा