Headlines

3 चौकार खाल्ले, विकेट घेताच श्रीलंकन गोलंदाज डिवचू लागला; यशस्वी थेट अंगावर धावला, कोलंबोत काय घडलं?


Yashaswi Jaiswal Video : भारत-श्रीलंका दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी यशस्वी जैस्वाल आणि असिथा फर्नांडो यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. एका षटकातील ३ चौकारांनंतर नेमकं मैदानात काय घडलं?

ind vs sl 2nd test yashasvi Jaiswal asitha fernando fight sledging
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर भारत-श्रीलंका सामने नेहमीच अटीतटीचे होतात, पण यावेळी कोलंबोमध्ये चक्क ‘राडा’ पाहायला मिळाला आहे. कोलंबोच्या सिंहलीज स्पोर्ट्स क्लबवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियाचा युवा आणि आक्रमक सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो एकमेकांना थेट भिडले. हा वाद इतका विकोपाला गेला की, दोघांमध्ये अक्षरशः धक्काबुक्की होण्याची वेळ आली होती.

नेमकं काय घडलं मैदानात?

दुसऱ्या कसोटीत टीम इंडिया प्रथम फलंदाजी करत असताना यशस्वी जैस्वाल अत्यंत लयीत दिसत होता. तो आपल्या अर्धशतकाकडे वेगाने कूच करत होता. डावाचे १७ वे षटक टाकण्यासाठी असिथा फर्नांडो आला. या षटकात यशस्वीने आक्रमक पवित्रा घेत पहिल्या ५ चेंडूंमध्येच ३ सणसणीत चौकार वसूल केले. या फटकेबाजीमुळे फर्नांडो चांगलाच खवळला होता. त्यानंतर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर यशस्वीला चकमा देण्यात तो यशस्वी ठरला. चेंडू बॅटला लागून थेट स्टंपवर आदळला आणि यशस्वी बोल्ड झाला.

Maharashtra TimesKarn Sharma Retirement : विराट कोहलीसोबत पदार्पण, कॅप नंबर ‘२८३’चा १९ वर्षांनी क्रिकेटला अलविदा; सलग ३ आयपीएल ट्रॉफी जिंकणारा खेळाडू नेमका कोण?

विकेट मिळाल्याच्या आनंदात फर्नांडोने भान हरपून पॅव्हेलियनकडे परतणाऱ्या यशस्वीला काहीतरी डिवचणारे शब्द वापरले. हे ऐकताच यशस्वी थेट माघारी फिरला आणि फर्नांडोच्या अंगावर धावून गेला. दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ येऊन उभे राहिले आणि एकमेकांना धक्का देण्याचा प्रयत्न करू लागले. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून श्रीलंकेच्या इतर खेळाडूंनी आणि पंचांनी तातडीने मध्यस्थी करत दोघांना वेगळे केले आणि पुढील अनर्थ टळला.

एकाच ओव्हरमध्ये ३ चौकार अन् संताप

यशस्वीजैस्वालने या डावात अत्यंत आक्रमक आणि संयमी फलंदाजीचा नजराणा पेश केला. त्याने ५३ चेंडूंचा सामना करताना ९ खणखणीत चौकारांच्या मदतीने ४५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू तो शिताफीने सोडत होता, मात्र आत येणाऱ्या चेंडूवर तो चकमा खाऊन बाद झाला. मात्र, बाद होण्यापूर्वी त्याने ज्या प्रकारे फर्नांडोला धुतले होते, त्यामुळेच तो गोलंदाज अधिक चिडलेला पाहायला मिळाला.

कुलदीप यादव आऊट, सारांश जैनची ‘एंट्री’

दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने १६५ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. आता दुसऱ्या सामन्यात कर्णधार शुभमन गिलने सलग दुसऱ्यांदा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मात्र, या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. स्टार फिरकीपटू कुलदीप यादवला ‘व्हायरल इन्फेक्शन’ झाल्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली असून, त्याच्या जागी युवा खेळाडू सारांश जैन याला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची मोठी संधी देण्यात आली आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा