Pune Baramati MLA Rohit Pawar Personal Assistant Daughter Suspiciously Dies Body Found Sainagar Area in the Morning; आईसोबत किरकोळ भांडण, मुलगी घरातून गेली, पुन्हा परतलीच नाही, पहाटे बॉडी दिसली; रोहित पवारांच्या PAच्या लेकीचा संशयास्पद अंत
Pune Baramati MLA Rohit Pawar Personal Assistant Daughter Suspiciously Dies Body Found Sainagar Area in the Morning; आईसोबत किरकोळ भांडण, मुलगी घरातून गेली, पुन्हा परतलीच नाही, पहाटे बॉडी दिसली; रोहित पवारांच्या PAच्या लेकीचा संशयास्पद अंत
Baramati Rohit Pawar Personal Assistant Daughter Death : मुलगी मिसिंग असल्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली. मात्र, सकाळी घराजवळ तिचा मृतदेह आढळला आहे.
रोहित पवार पीए मुलगी मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
दीपक पडकर, पुणे (बारामती) : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरातील रुई परिसरातील साईनगर येथे एका 14 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली. ही मुलगी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या स्वीय सहाय्यकांची मुलगी असल्याची माहिती आहे. प्राथमिक परिस्थितीत आत्महत्येची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी तिच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
आईसोबत किरकोळ कारणावरून भांडण
मिळालेल्या माहितीनुसार, काल शनिवारी रात्री या मुलीचं आईसोबत किरकोळ कारणावरून भांडण झालं होतं. त्यानंतर ती घरातून बाहेर पडली. बराच वेळ ती घरी न परतल्यानं कुटुंबीयांनी तिचा शोध घेत पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आज रविवारी सकाळी साईनगर परिसरात तिचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलीचा मृत्यू आत्महत्या? की अन्य कारणामुळे झाला? याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. सध्या या प्रकरणात हत्या असल्याचंही स्पष्ट झालेलं नाही. शवविच्छेदन अहवाल आणि तपासातूनच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार रोहित पवार बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला भेट देणार असल्याची माहिती आहे. अल्पवयीन मुलीच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांसह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांकडून या प्रकरणाच्या सर्व बाजू तपासल्या जात आहेत.
मुंबईत बाप्पाच्या आगमनावेळी दुर्घटना
मुंबईतल्या भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दोघांचा मृत्यू झाला. मूर्तीचा तोल गेल्यानं त्याखाली दबून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटना काल शनिवारी रोजी सायंकाळी घडली.
भुलेश्वरच्या राजाची ही मिरवणूक भायखळ्याहून भुलेश्वरच्या दिशेनं निघाली होती. अखिल भुलेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मंडप अवघ्या 50-60 मीटर अंतरावर बाप्पाची मूर्ती आली होती. याचदरम्यान 22 फूट मूर्तीचा तोल गेला. त्याखाली मंडळातील काही कार्यकर्ते दबले गेले. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. मृत व्यक्तींची नावे संकेत नेवशे (वय 33) आणि ब्रिजेश हेमंत जोशी (वय 30) अशी आहेत. या दोघांना रुग्णालयात आणलं असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं. जखमी झालेल्या पाच जणांमध्ये 5 आणि 7 वर्षे वयाच्या दोन मुलींचा समावेश होता. जखमींवर जीटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हृदयद्रावक बाब म्हणजे, या दुर्घटनेत मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवसे यांचा मृत्यू झाला आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा