![]()
Maharashtra FDA : हे गुरेही खात नाहीत! अंगणवाडी आहाराची तपासणी करण्याची ‘एफडीए’कडे मागणी
गर्भवती, स्तनदा माता आणि तीन ते सहा वर्षांच्या मुलांना अंगणवाड्यांमधून दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत अंगणवाडी सेविकांच्या संघटनांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत. ‘हा आहार लाभार्थी काय, गुरेही खात नाहीत,’ अशी तक्रार करत अन्न व औषध प्रशासनाने या आहाराचे नमुने तपासावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. ‘२०१८ पासून आहाराचे दर वाढलेले नाहीत.
