SEBI ने मे 2026 मध्ये नॉमिनेशनसंदर्भात असणाऱ्या नियमांमध्ये काही बदल केले होते. नॉमिनेशन ही पद्धत आधीपासून अस्तित्वात होती परंतु ऑप्शनल होती. गुंतवणूकदारांना नॉमिनीची निवड करायची नसल्यास जागा रिकामी सोडता येत होती, परंतु आता तसे करता येणार नाही. नव्या नियमानुसार, आता गुंतवणूकदाराला एक तर नॉमिनीची निवड करावी लागेल आणि जर नॉमिनी ठेवायचा नसेल तर तसे अधिकृतपणे सांगावे लागणार आहे. 1 सप्टेंबरपासून या नियमांना लागू करण्यात येणार आहे. परंतु, येथे लक्षात घेण्याची बाब म्हणजे फक्त सिंगल होल्डर Dmat खाते धारकांसाठीच हा नियम आहे.
जर तुम्ही सिंगल होल्डर Dmat खातेधारक आहात किंवा तुमच्याकडे असणारे Mutual Fund Folio एकट्या तुमच्याच नावावर आहे तर तुम्हाला नॉमिनेशनची माहिती भरणे बंधनकारक आहे. तुमच्याकडे दोन पर्याय असतील : एक तर नॉमिनीची निवड करा, अन्यथा नॉमिनी नको आहे असे अधिकृतपणे जाहीर करा. पण नॉमिनीचा पर्याय रिकामा सोडू नका.
जर तुमच्याकडे Joint Dmat खाते आहे किंवा तुमचा Mutual Fund Folio एकापेक्षा अधिक जणांच्या नाववर आहे, तर तुम्ही नॉमिनेशनचा पर्याय रिकामा सोडू शकता. पण जर तुम्हाला नॉमिनी ठेवायचा असेल तर तुमच्या सगळ्या भागीदारांकडून अधिकृतपणे संमती मिळवणे बंधनकारक आहे.
सगळ्या प्रकारच्या Dmat खातेधारकांना फक्त 3 नॉमिनीची निवड करता येऊ शकते. तसेच गुंतवणूकदार त्याच्या इच्छेनुसार गुंतवणुकीचे वाटप करू शकतो. जर गुंतवणूकदाराने मृत्यू अगोदर गुंतवणुकीच्या वाटपाची टक्केवारी दिली नाही तर गुंतवणूक समान टप्प्यांमध्ये वाटली जाते.
उदाहरणार्थ., जर गुंतवणूकदाराच्या खात्यात 9 लाखांची रक्कम असेल आणि 3 नॉमिनीज् असतील पण गुंतवणूकदाराने शेअर्स/गुंतवणूक वाटपाची टक्केवारी जाहीर केली नसेल तर प्रत्येक गुंतवणूकदाराला गुंतवणुकीचा समान भाग मिळेल. 9 लाखांची रक्कम 3 जणांमध्ये 3-3-3 लाखांच्या समान भागात वाटली जाईल. पण जर गुंतवणुकीच्या समान वाटपात एक लहान हिस्सा उरला तर तो पहिल्या क्रमांकावर असलेल्या नॉमिनीला दिला जातो.
Real Estate: बिल्डर अन् जमीन मालक दोघांसाठी फायद्याचा आहे JDA करार; पूर्ण समजून घ्या, नंतर कटकट नको!जर गुंतवणूकदाराने नॉमिनीची निवड केली नसेल तर त्याच्या मृत्यूनंतर त्याची मालमत्ता कायदेशीर वारसाकडे जाते. पण कायदेशीर वारसाला आधी मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जमा करावे लागत होते, त्यानंतर हातात रक्कम मिळत होती. पण आता जर मृत गुंतवणूकदाराच्या खात्यात असणारी रक्कम कमी असेल तर त्यासाठी फार अशा कागदपत्रांची गरज भासणार नाहीये.
सेबीने Quick Transmission Processing (QTP) ही सुविधा आणली आहे. या सुविधेअंतर्गत, आता 10,000 रुपयांपर्यंतच्या फिजिकल Holdings आणि 30,000 रुपयांपर्यंतच्या Dmat Holdings क्लेम करण्यासाठी डॉक्युमेंटेशनची प्रक्रिया कमी ठेवण्यात आली आहे. तर 10 लाख रुपयांपर्यंतच्या फिजिकल Holdings आणि 30 लाख रुपयांपर्यंतच्या Dmat Holdings साठी प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. या नियमाचा मुख्य फायदा असा आहे की नॉमिनेशन स्पष्ट झाल्यावर योग्य व्यक्तीच्या माहितीची नोंद आशीच असल्यामुळे ट्रान्समिशन प्रक्रिया अधिक सोपी होते आणि Unclaimed गुंतवणुकी टाळता येतात.

