Headlines

Billionaire Anti-Ageing Bet; मृत्यूला जिंकायला निघाले अब्जाधीश; काहीही करायला किती खर्च करायला तयार, अमर होण्याच्या वेडापायी कोट्यावधींचा चुराडा

Billionaires Longevity: आयटी क्षेत्रातील अब्जाधीश आणि दीर्घायुष्याच्या संशोधन आणि तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. तारुण्य टिकवण्याच्या प्रयत्नांना ऐतिहासिकदृष्ट्या मर्यादित यश मिळाले आहे, पण नवीन विज्ञान आशादायी बनले असून केवळ श्रीमंत लोकांनाच सुरुवातीचे उपचार परवडू शकतात त्यामुळे, या प्रयत्नांमुळे विषमतेबद्दल चिंता निर्माण होते.

Tech Billionaire's Longevity Bet
मृत्यूला जिंकायला निघाले अब्जाधीश; अमर होण्याच्या वेडापायी कोट्यावधींचा चुराडा
Billionaires Longevity: तंत्रज्ञानामुळे मृत्यूला लांबणीवर टाकले जाऊ शकते का? जन्म-मृत्यू आपल्या हातात नसतं. अनेकांना वाटतं की आपण दीर्घायुषी व्हावं, पण यासाठी काय करायचं अनेकांना माहिती नसतं. पण मृत्यूला हरवण्याची स्वप्ने पाहणारे जगातील अनेक अब्जाधीश मृत्यूला चकवा देण्यासाठी आपली प्रचंड संपत्ती वृद्धत्व रोखण्यासाठी खर्च करत आहेत.

मृत्यूला हरवायला निघाले अब्जाधीश

मृत्यूला हरवायला निघाले अब्जाधीश

जे वैद्यकीय शास्त्र आणि धर्माला जमलं नाही, ते तंत्रज्ञान करू शकेल असा अब्जाधीशांचा विश्वास आहे. अशा प्रयोगांवर प्रचंड पैसा खर्च केला जात असून जेफ बेझोसपासून ते सॅम ऑल्टमनपर्यंत अनेक दिग्गज दीर्घायुष्याच्या या शोधात उतरले आहेत. यामध्ये जास्तीत जास्त काळासाठी निरोगी राहणं यांसारख्या व्यवहार्य कल्पना आणि भव्य महत्त्वाकांक्षा दोन्ही आहेत. उदाहरणार्थ, नैसर्गिक वृद्धत्वाची प्रक्रिया उलटवणे, निकामी अवयव बदलणे आणि अखेरीस अमरत्व यांसारखं काहीतरी साध्य करणं.

‘दीर्घायुष्य’पासून ‘मृत्यू टाळणे’ पर्यंत

‘दीर्घायुष्य’पासून ‘मृत्यू टाळणे’ पर्यंत

ब्रायन जॉन्सन, एक आयटी उद्योजक, या दीर्घायुष्याच्या चळवळीतील सर्वात प्रमुख व्यक्तिमत्वांपैकी आहे. ब्रायन आपलं तारुण्य कायम ठेवण्यासाच्या प्रयत्नात दरवर्षी लाखो डॉलर्स खर्च करत आहेत. पण, जॉन्सन एकटे नाही. बायोटेकमधील गुंतवणुकीपासून प्रायोगिक उपचार आणि वेअरेबल टेक्नॉलॉजीपर्यंत जगातील काही सर्वात श्रीमंत लोक एकाच मूलभूत कल्पनेच्या दिशेने वेगवेगळे मार्ग अवलंबत आहेत: वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावली जाऊ शकते, उलटवली जाऊ शकते किंवा अखेरीस त्यावर मात केली जाऊ शकते का?

ब्रायन जॉन्सनचा 2 दशलक्ष डॉलरचा खर्च

ब्रायन जॉन्सनचा 2 दशलक्ष डॉलरचा खर्च

ब्रेनट्री कंपनीचे संस्थापक ब्रायन जॉन्सन आघाडीच्या समर्थकांपैकी आहेत. जॉन्सन त्यांच्या ‘प्रोजेक्ट ब्लूप्रिंट’ नावाच्या या दीर्घायुष्य आणि वृद्धत्वविरोधी प्रोटोकॉलवर दरवर्षी अंदाजे 2 दशलक्ष डॉलर्स खर्च करतात. दररोज फक्त 1977 कॅलरी शाकाहारी आहारासह हळद, जस्त यांसारखी पूरक औषधे घेतात आणि नियमित व्यायाम करतात. तसेच त्यांनी प्लाझ्मा एक्सचेंज थेरपी केली, ज्यामध्ये शरीरातील विषारी द्रव काढले जातात जेणेकरून त्यांचे हृदय 37 वर्षांच्या तरुणासारखे, त्वचा 28 वर्षांची आणि फुफ्फुस 18-19 वर्षांच्या व्यक्तीसारखे झाले आहेत.

सॅम ऑल्टमनचा 18 कोटी डॉलरचा डाव

सॅम ऑल्टमनचा 18 कोटी डॉलरचा डाव

याशिवाय OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी रेट्रो बायोसायन्सेस या बायोटेक कंपनीमध्ये कोटी डॉलर डॉलर्सची गुंतवणूक केली आहे, जी निरोगी आयुष्याची वर्षे वाढवू शकणाऱ्या तंत्रज्ञानावर काम करत आहे. ऑल्टमन वृद्धत्वविरोधी नित्यक्रमाचा भाग म्हणून मेटफॉर्मिन औषधही घेत आहेत, पण मधुमेहावरील औषध निरोगी लोकांचे आयुर्मान वाढवू शकते याचा कोणताही निश्चित पुरावा नाही.

जेफ बेझोस यांनीही केलीये मोठी गुंतवणूक

जेफ बेझोस यांनीही केलीये मोठी गुंतवणूक

ॲमेझॉनचे संस्थान जेफ बेझोस Altos Labs च्या बड्या निधीदात्यांपैकी आहेत. ही बायोटेक कंपनी पेशींच्या पुनरुज्जीवनावर काम करत असून पेशींचे आरोग्य आणि मजबुती पुनर्संचयित करण्यावर कंपनीचे रिसर्च केंद्रित आहे, ज्याचा उद्देश रोग, दुखापत आणि वयानुसार होणारी घट उलटवण्याचा आहे. अमरत्वाच्या आश्वासनापेक्षा ही कल्पना अधिक व्यावहारिक आहे. शास्त्रज्ञ वृद्ध किंवा खराब पेशींना तरुण पेशींप्रमाणे कार्य करण्यास प्रवृत्त करू शकले, तर यामुळे लोकांच्या निरोगी आयुष्याची वर्षे वाढू शकतील.

एलन मस्क यांचीही हीच कल्पना

एलन मस्क यांचीही हीच कल्पना

दुसरीकडे, जगाचे पहिले ट्रिलिनेअर Elon Musk दीर्घायुष्यासाठी तांत्रिक दृष्टिकोनाचे कदाचित ‘सर्वात मनोरंजक’ वर्णन केले. भविष्यवेत्ता पीटर डायमंडिस यांच्याशी बोलताना मस्क म्हणाले, “अर्ध-अमरत्व एक अशी समस्या आहे, जी सहजपणे सोडवली जाऊ शकते.” माणसांची जैविक रचनाच मुळात मरण्यासाठी झालेली असून ही जैविक रचना बदलली, तर लोक अधिक काळ जगू शकतील, असा मस्क युक्तिवाद करतात.

दीपिंदर गोयल यांचा प्लॅन काय

दीपिंदर गोयल यांचा प्लॅन काय

दीर्घायुष्य वाढवणारे तंत्रज्ञान केवळ जागतिक स्तरावर नव्हे तर, भारतीय व्यावसायिकांमध्येही लोकप्रिय होत आहे.Zomato म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इटरनलचे अब्जाधीश संस्थापक दीपेंद्र गोयल ‘टेम्पल’ नावाचे परिधान करण्यायोग्य उपकरण सादर करत आहेत. कपाळाच्या बाजूला परिधान करण्याच्या या लहान उपकरणाची किंमत $1,000 (अंदाजे 90,000 रुपये) असेल, जे शरीरातील चयापचय आणि एन्ट्रॉपी बायोमार्कर्सचा रिअल-टाइममध्ये मागोवा घेईल.या उपकरणाला अद्याप स्वतंत्र वैज्ञानिक मान्यता किंवा वैद्यकीय नियामक मंजुरी मिळालेली नसली तरी, प्री-ऑर्डर आधीच सुरू झाल्या आहेत आणि या वर्षाच्या अखेरपर्यंत डिलिव्हरी अपेक्षित आहे.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा