वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या बीडमधील वक्तव्यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. विलास घुले प्रकरणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर टीका करताना सदावर्तेंनी थेट मराठा समाजाच्या नोकऱ्यांना चॅलेंज करणार, असा इशारा दिलेला. यानंतर आता मराठा समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करत जरांगेंचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. सदावर्ते यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करावा, तसंच त्यांना तडीपार करावे, असे काळकुटे यांनी म्हटले.