शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, प्रदेश सचिव प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, शहराध्यक्ष नीलेश खैरे उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, की सन २०२९च्या सार्वत्रिक निवडणुकीत केंद्रात सत्ताबदल होऊ शकतो. यापूर्वी शेतकऱ्यांनी आंदोलन केले. त्यामध्ये सुमारे सातशे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. परंतु, विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. सरकारला या आंदोलनाची तीव्रता लक्षात आली आहे.
Nashik News : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीने भरलेला डंपर 10 ते 12 फूट खाली अडकलाभाजपमधील संभाव्य नेतृत्वबदलाच्या वृत्तांचा संदर्भ देत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपपंतप्रधान होण्यासाठी उत्सुक असल्याचे चव्हाण म्हणाले. कोणाला शिक्षणमंत्री केले जाते यावर सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. परीक्षांमधील गोंधळ थांबविणारा, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची जाण असणारा स्वतंत्र मंत्री देशाला हवा आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंड दौऱ्यानंतर तेथील जागेचे भाजप कार्यकर्त्यांनी ‘शुद्धीकरण’ केल्याच्या घटनेचा चव्हाण यांनी निषेध नोंदविला. ही भाजपची घृणास्पद आणि विकृत मानसिकता दाखविणारी घटना आहे. देशात एकाधिकारशाही आणि हिटलरशाही आणण्याचा प्रयत्न सुरू असून, ईडी, सीबीआय आणि प्राप्तिकर विभागाचा वापर करून विरोधी पक्ष फोडले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
Nashik Crime : 43 वर्षीय बॉयफ्रेण्डने नाशिकच्या 34 वर्षीय विवाहितेला संपवलं, सात वर्षांची लेक पोरकी, लग्नबाह्य संबंधांचा दुर्दैवी शेवट‘फडणवीसांनाही आमचा विरोध’
महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले, तर ती त्यांना बढती असेल. परंतु, त्यांना शिक्षणमंत्रिपद देण्यास आमचा तीव्र विरोध राहील, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. ‘नीट’ पेपरफुटीसारखे प्रकार महाराष्ट्रातच उघडकीस आले आहेत. फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातच पेपरफुटीच्या या घटना घडल्या आहेत. फडणवीस हे सक्षम असले, तरी शिक्षण खात्यासाठी उपयुक्त नाहीत. त्यामुळे काँग्रेसचा फडणवीसांना विरोध असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
चव्हाण म्हणाले…
- तीन पक्षांनी एकत्र यावे हा प्रस्ताव डिसेंबर २०१४मध्येच आपल्याकडे आला होता; पण आपण तो फेटाळला
- सरकारची प्राथमिकता चुकत आहे. शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मितीवर भर हवा
- मोदींनी केलेल्या अनेक बोगस घोषणा खपून गेल्या
- निर्मला सीतारामन यांनी अर्थखात्याची वाट लावली. शिक्षण खाते दिले, तर त्याचीही वाट लागेल
- शिक्षणमंत्री म्हणून केंद्र सरकारला बाहेरचा शिक्षणतज्ज्ञ आणावा लागेल
- सर्व कुलगुरू संघविचाराची सुमार माणसे आहेत
- अभिजित दीपके यांच्या शिक्षणविषयक मागण्यांना माझा पाठिंबा आहे
- राजकीय आश्रयाशिवाय पेपरफुटी अशक्य आहे
- शिक्षण क्षेत्रात माफियांची घुसखोरी झाली आहे
- भावी पिढी घडवायची आणि ‘एआय’चे आव्हान पेलायचे असेल तर चांगला शिक्षणमंत्री हवा

