राष्ट्रवादी म्हणजे कुणाची मालकी नाही, अध्यक्ष शरद पवारच! सुप्रिया सुळे ठामपणे बोलल्या – ncp sc case supriya sule backs sharad pawar with strong statement
राष्ट्रवादी म्हणजे कुणाची मालकी नाही, अध्यक्ष शरद पवारच! सुप्रिया सुळे ठामपणे बोलल्या – ncp sc case supriya sule backs sharad pawar with strong statement
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतची सर्वोच्च लढाई सुरू असतानाच शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे. राष्ट्रवादीची न्यायालयीन लढाई सुरू असतानाच दोन्ही गट एकत्र येऊ शकतात अशी शक्यता वारंवार व्यक्त केली जाते. त्यातच शरद पवार पंतप्रधान मोदींना भेटतात, शिवाय पवारांचे खासदारही पंतप्रधानांची भेट घेतात. यावरून उलट सुलट चर्चा सुरू असतानाच आता सुप्रिया सुळेंनी ठाम प्रतिक्रिया दिली आहे.