Headlines

नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीने भरलेला डंपर 10 ते 12 फूट खाली अडकला


नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्ता खचल्याने एक खडीने भरलेला डंपर त्यात कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेचा फोटो अंगावर काटा आणणारा आहे. या घटनेतून रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कुणाला इजा झालेली नाही.

Nashik News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नाशिक : नाशिकमध्ये रस्त्यांची गुणवत्ता आणि रस्त्यांवरील खड्डे हे मुद्दे पुन्हा चर्चेला कारण ठरले आहेत. त्यामागे कारण देखील तसंच आहे. एक खडीने भरलेला डंपर खडी उतरवत असताना धक्कादायक प्रकार घडला. डंपर ज्या ठिकाणी उभा होता तिथला रस्ता थेट 10 ते 12 फुट खोल खाली खचला. यामुळे हा डंपर या दहा ते बारा फुटांच्या खड्ड्यात अडकला. संबंधित घटना ही गंगापूर रोडवर नवश्या गणपती परिसरात घडली. रस्ते कामासाठी खडी उतरवत असताना संबंधित घटना घडली आहे.

रस्त्याच्या कामाचा दर्जा आणि सुरक्षेवर प्रश्न उपस्थित

या घटनेमुळे रस्त्यांच्या कामाचा दर्जा आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच या घटनेत सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र या घटनेमुळे शहरातील रस्त्यांचे कामे आणि खड्डे यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडून 80 टक्के खड्डे बुजवल्याचा आणि कामाची गुणवत्ता चांगला असल्याचा दावा केला जात असतानाच दुसरीकडे ही मोठी दुर्घटना समोर आली आहे.

कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विकासकामे सुरु

नाशिकमध्ये पुढच्यावर्षी सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे. या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु आहेत. या विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर शहरभरात काम सुरु आहे. रस्ते, पाणी पुरवठा, मलनिस्सारण, वीज तसेच पायाभूत सुविधांचे काम एकाचवेळी सुरु आहे. त्यामुळे नाशिककरांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

खड्ड्यांमुळे विविध घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू

शहरभरात विविध ठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले होते आणि त्यांचे काम सुरु होते. यामुळे परिणामी वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण व्हायची. आता काही ठिकाणी रस्त्यांचे काम होत आल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. या खड्ड्यांमुळे नाशिकमध्ये पाच निष्पाप जीवांचा गेल्या काही दिवसांत मृत्यू झाला. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

रस्ता खचल्याच्या घटनेमुळे चिंता वाढली

एकीकडे नाशिकमध्ये रस्त्यांवरील खड्डे आणि रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेवरुन प्रश्न उपस्थित केले जात असतानाच डंपरच्या वजनाने थेट रस्ता खचल्याची घटना घडली. या घटनेमुळे रस्त्याच्या कामाचा दर्जा काय आहे? असा प्रश्न उपस्थित होतोय. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. या घटनेत कुणाचा जीव गेला असता तर त्याला जबाबदार कोण असतं? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. या प्रकरणाची दखल घेऊन काही कारवाई केली जाते का? तसेच कुणावर कारवाई होते? ते पाहणं देखील महत्त्वाचे आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा