Headlines

Pune Hadapsar Shewalewadi Police Sub Inspector Beats Wife and Abortion Causes she is not Born Son; पुण्यात रक्षकच बनला भक्षक! मुलगा होत नाही म्हणून पुण्यात PSI पतीची पत्नीला मारहाण, शेतात नेऊन जबरदस्ती गर्भपात


Pune Crime News : ‘तुला मुलगा होत नाही,’ असे म्हणून पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तिचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी मांजरी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षकासह त्याच्या आईविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Pune Crime News
हडपसर पोलीस उपनिरीक्षक पत्नीला मारहाण गर्भपात(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अभिजीत दराडे, पुणे : खाकी वर्दीचा धाक गुन्हेगारांवर असावा लागतो, पण इथे खुद्द कायद्याचा रक्षकच घरातल्या लक्ष्मीसाठी यमदूत बनल्याचा संतापजनक प्रकार पुण्यात समोर आला आहे. ‘तुला मुलगाच जन्माला घालता येत नाही,’ असा विकृत संताप करून पुण्यातील मांजरीतील एका पोलीस उपनिरीक्षकाने स्वतःच्या पत्नीचा गळा आवळून तिला संपवण्याचाच प्रयत्न केला आहे.

आई-मुलावर गर्भपाताचा गुन्हा

इतकेच नाही, तर पोटातील बाळ मुलगी असल्याचं कळताच तिची जबरदस्तीने गर्भलिंग तपासणी करून पोटातील अंकुर मारून टाकल्याचा संतापजनक प्रकार आता समोर आला आहे. ​हडपसरमधील शेवाळेवाडी येथे पी. एस. व्हिलामध्ये राहणारे पोलीस उपनिरीक्षक धनाजी रंगराव टोणे आणि त्यांची आई अनुसया रंगराव टोणे यांच्यावर आता हत्येचा प्रयत्न आणि बेकायदेशीर गर्भपाताचा गंभीर गुन्हा नोंदवला गेला आहे.

Maharashtra TimesPune Crime : पुण्यात दोस्तीत कुस्ती! व्हॉट्सॲपवर स्टेटसमुळे डोक्यात सणक, वेताळ टेकडीवर बोलावून जवळच्याच मित्रांनी काटा काढला; अल्पवयीन मुलाचा मृत्यू

अवघ्या दोन महिन्यांतच सुखाचे दिवस संपले

19 मे 2019ला जतमध्ये या दोघांचा संसार सुरू झाला, पण लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांतच सुखाचे दिवस संपले. धनाजी यांनी पत्नीवर नोकरी करण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली आणि तिथूनच छळाचा घाणेरडा खेळ सुरू झाला. ​2020 मध्ये जेव्हा पत्नी पहिल्यांदा गरोदर राहिली, तेव्हा तिच्या पोटातील जीवाचा कोणताही विचार न करता तिला बेदम मारहाण करण्यात आली. इतकंच नाही तर सातव्या महिन्यात अंगावर बसून लाथाबुक्क्यांचा मारा करण्यात आला. पुढे 27 जानेवारी 2022ला मुंबईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धनाजी यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला. बाहेर झालेल्या कारवाईचा आणि अपमानाचा सगळा राग धनाजी यांनी घरात येऊन काढला आणि निष्पाप पत्नीचं डोकं फरशीवर आपटूनतिला रक्तबंबाळ केलं.

पत्नीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने गर्भपात

​यानंतर त्यांची पुण्यात बदली झाली. मार्च 2025 मध्ये पत्नी दुसऱ्यांदा गरोदर राहिली. 13 मे रोजी धनाजी आणि त्यांच्या आईने तिला बळजबरीने एका अज्ञात गावातील शेतातल्या घरात नेलं आणि तिथे बेकायदेशीरपणे गर्भलिंग तपासणी करवून घेतली. 19 मे रोजी गर्भातील बाळ मुलगी असल्याचं समोर येताच या माय-लेकांच्या डोक्यात विकृती आली. गर्भपातासाठी पत्नीवर आणि तिच्या माहेरच्यांवर प्रचंड दबाव आणला गेला. पत्नीच्या वडिलांनी नकार देताच स्वतः पोलीस उपनिरीक्षक असल्याचा माज दाखवून धमक्या देण्यात आल्या. अखेर 23 मे रोजी वाघोलीतील समर्थ हॉस्पिटलमध्ये पत्नीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने गर्भपात उरकला गेला.

Maharashtra TimesAccident News : ‘मामा, दादाची ड्युटी संपली, मी घेऊन येतो’; दोन्ही भाचे पुन्हा परतलेच नाहीत, सख्ख्या भावांचा करुण अंत; बापावर लेकरांना खांदा देण्याची वेळ

तक्रार केली; म्हणून पुन्हा मारहाण

गर्भपातानंतर महिलेने पोलिस उपायुक्तांकडे पतीविरुद्ध तक्रार केली होती. त्यानंतर पोलीस उपायुक्तांनी धनाजी टोणे यांना सक्त शब्दांत समज दिली. याचा राग मनात ठेवून ‘तू तक्रार का केलीस,’ असं म्हणत टोणे यांनी पत्नीला मारहाण केल्याचं तक्रारीत नमूद आहे. गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

तात्काळ सुट्टी टाकून पळ फरार

​या प्रकाराने या हैवान PSIच्या पत्नीची प्रकृती पार खालावली आणि त्या कशाबशा माहेरी पोहोचल्या. वरिष्ठांकडे तक्रार करूनही जेव्हा हा छळ थांबला नाही, तेव्हा त्यांनी थेट हडपसर पोलिसांकडे धाव घेतली. आता हा गुन्हा मांजरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून पोलीस निरीक्षक इरफान नदाफ या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, आपल्यावर कारवाई होणार याची चाहूल लागताच स्वतःला कायद्याचे रक्षक म्हणवणारे उपनिरीक्षक धनाजी टोणे यांनी तात्काळ सुट्टी टाकून पळ काढला आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा