अनेक दशकांची कारकीर्द, असंख्य चित्रपट आणि नाटकांमधील भूमिका; तरीही नाटकाच्या प्रयोगात पहिली एन्ट्री घेताना आजही मी आतून धास्तावलेलाच असतो. ती एन्ट्री योग्य झाली की पुढे सगळे ठीक होते, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांनी व्यक्त केली.
नागपुरात आयोजित प्रकट मुलाखतीतअशोक सराफ यांनी आपल्या खास शैलीत अभिनयप्रवास उलगडला. त्यांच्या आठवणींना भरगच्च सभागृहातून वारंवार दाद मिळाली. ‘लहानपणी शक्य त्या सगळ्या खोड्या केल्या. त्यामुळे वडील आणि शिक्षकांकडून मारही खाल्ला. नाटक हाच माझा जीव की प्राण. नाटक करताना कलाकार ताजातवाना राहतो, सतत नवीन करण्याची इच्छा जागी राहते’, असे ते म्हणाले.
Ashok Saraf On New Generation: सांगितले तरी ते ऐकणार आहेत का? त्यामुळे आपण कुणालाही काही सांगण्याच्या भानगडीत पडू नये; नव्या पिढीबद्दल स्पष्टच बोलले अशोक सराफ
चित्रपटांच्या व्यग्रतेमुळे काही काळ रंगभूमीपासून दूर राहावे लागल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. ‘एकावेळी तीन-तीन चित्रपटांत काम करीत असल्याने नाटक करता आले नाही. मात्र, रंगभूमी सोडायची नव्हती. म्हणून १२ वर्षांनी ‘हसत खेळत’ केले आणि त्याचे ४००-५०० प्रयोग झाले’, अशी आठवण त्यांनी सांगितली. चांगले लेखन असेल, तर प्रसंग अधिक प्रभावी होतो. चित्रपट किती चकचकीत आहे यापेक्षा कथा किती दमदार आहे, हे महत्त्वाचे ठरते, असेही त्यांनी नमूद केले. दादा कोंडके यांच्या आठवणी सांगताना सराफ म्हणाले, ‘त्यांच्यासारखा उत्फूर्त माणूस पाहिला नाही. त्यांचे सुरुवातीचे चित्रपट उत्तम होते. नंतर ते द्विअर्थी संवादांकडे वळले. असा विनोद जास्त काळ टिकत नाही; सकस विनोदच यशस्वी ठरतो. तरीही दादांनी ते चित्रपटही प्रचंड यशस्वी करून दाखविले.’
Ashok Saraf On New Generation: सांगितले तरी ते ऐकणार आहेत का? त्यामुळे आपण कुणालाही काही सांगण्याच्या भानगडीत पडू नये; नव्या पिढीबद्दल स्पष्टच बोलले अशोक सराफ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्या हस्ते अशोक सराफ यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यांना स्मृतिचिन्ह आणि पाच लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. सराफ यांच्या ऐंशीव्या वर्षातील पदार्पणानिमित्त ऐंशी दिव्यांनी औक्षण करण्यात आले. विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे गिरीश गांधी यांनी सन्मानचिन्ह आणि ५१ हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरव केला. तसेच श्री सिद्धिविनायक ट्रस्टतर्फे १ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
‘मराठी सिनेमाला वेगळे वळण, उंची आणि लोकाभिमुखता अशोक सराफ यांनी दिली. त्यांच्या सहजतेत आणि अकृत्रिमतेत त्यांच्या यशाचे रहस्य आहे. मराठी माणसाला आपलेच प्रतिबिंब त्यांच्यात दिसले’, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी गौरव केला.
‘नागपुरात झाला तसा माझा सत्कार कुठेच झाला नाही. तुमच्या आजच्या कृतीने तुम्ही मला आहे त्यापेक्षा मोठे केले. माझा तुमच्याशी संबंध फक्त माझ्या कलाकृतीतून आला; आणि तुम्ही ते इतकी वर्षे गोड मानून घेतले, यापेक्षा मोठा आनंद काय’, असे सराफ म्हणाले.
किशोरी शहाणे जेव्हा अशोक सराफ यांच्यासोबतचे खास क्षण सांगतात…
कार्यक्रमाला महापौर नीता ठाकरे, सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे संदीप जोशी, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे गिरीश गांधी, उपमहापौर लीलाताई हाथीबेड, स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दाणी वखरे, महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर आदी उपस्थित होते. निकेता जोशी, मुकुल पांडे आणि भाग्यश्री बारस्कर यांनी सराफ यांची गाजलेली गाणी सादर केली.
‘माझी ‘म्ह्या’ ही एकांकिका पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. लोक पायऱ्यांवर बसून प्रयोग पाहत होते. त्याच गर्दीत लक्ष्मीकांत बेर्डेही बसला होता. नंतर तो सुधीर जोशींना म्हणाला, ‘मला अशोक सराफ व्हायचे आहे.’ पुढे तो खरोखर मोठा झाला; पण त्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली. अक्षरशः शून्यातून त्याने विश्व उभे केले. आम्ही दोघांनी मिळून जवळपास ५० चित्रपट केले आणि त्यापैकी अनेक लोकप्रिय ठरले’, अशी आठवण अशोक सराफ यांनी सांगितली.
Tukaram Mundhe प्लिज याकडेही लक्ष द्या; ऑनलाइन ऑर्डरसोबत जिवंत झुरळ घरात,श्वेता तिवारीने मागितली मदत, व्हिडिओ व्हायरल