Headlines

Baldev Puri : ‘अभिनेत्रीचे तिघांसोबत संबंध होते’, पती-पत्नीची अफेअर्स; बॉलिवूड जोडप्याबद्दल डिटेक्टिव्हचा दावा


Baldev Puri On Bollywood Couple : डिटेक्टिव्हनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये बॉलिवूड जोडप्याबद्दल खुलासा केला आहे.

Baldev Puri On Bollywood Couple
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – बॉलिवूड कलाकारांचं आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नसतं. अनेकदा कलाकरांच्या आयुष्यातील रहस्य उघड होतात. यापैकी बहुतेक प्रकरणांमध्ये एकमेकांना फसवणाऱ्या जोडप्यांचा समावेश असतो. अशातच आता डिटेक्टिव्ह बलदेव पुरी यांनी अशाच एका जोडप्याबद्दल सांगितलं आहे.

बॉलिवूड जोडप्याची पोलखोल

डिटेक्टिव्ह बलदेव पुरी यांनी सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत एका अभिनेता जोडप्याबद्दल सांगितलं. या जोडप्याचं वैवाहिक आयुष्य सुखी नव्हतं. अभिनेत्रीच्या भावानं त्यांच्याशी संपर्क साधलेला आणि त्यानं सांगितलं की, त्याच्या बहिणीला असं वाटतंय की, तिचा मोबाईल फोन हॅक झाला आहे. बलदेव यांनी सांगितलं की, त्या अभिनेत्याचं स्वतःचं एक प्रोडक्शन हाऊस देखील होतं आणि तो व्यावसायिक व्यवहारांसाठी अभिनेत्रीची बनावट सही करायचा.

Miss World स्पर्धेत मानुषी छिल्लरने सादर केलेले डान्स Nakul Ghanekar याने केलेले कोरिओग्राफ

डिटेक्टिव्ह बलदेव पुरी म्हणाले, ‘अभिनेता त्याच्या प्रोडक्शन हाऊसमधून पैसे काढून वैयक्तिक गुंतवणुकीत गुंतवत होता. त्या अभिनेत्यानं आपल्या पत्नीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि ती दिवसभर कोणाला भेटते हे पाहण्यासाठी दोन लोकांना कामावर ठेवलं होतं. अभिनेत्यानं पत्नीच्या गाडीत एक जीपीएस बसवलं आहे. त्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये एक रेकॉर्डरही बसवलेला होता.’ बलदेव यांनी पुढे सांगितलं की, त्या अभिनेत्रीला तो रेकॉर्डर सापडला आणि तिनं तो मला आणून दिला. त्यातून आम्हाला माहिती मिळाली.

Maharashtra TimesVijay Nikam : ‘मी आर्थिकदृष्ट्या शून्यावर आलो’, सिनेमासाठी विकली जमापुंजी, डोक्यावर लाखोंचं कर्ज; मराठी अभिनेत्यानं सांगितला कठीण काळ
‘अभिनेत्रीला समजताच तिनं खूप गोंधळ घातला. ती त्याच्यावर ओरडत होती. ‘माझी खोटी सही करायची तुझी हिंमत कशी झाली? तू स्वतःला समजतोस तरी कोण?’ गुप्तहेर क्लायंटला रेकॉर्डिंग करण्याचा सल्ला देऊ शकतात, पण ते स्वतः कुठेही रेकॉर्डर लावू शकत नाहीत, असं बलदेव यांनी सांगितलं. ‘त्या अभिनेत्याकडे खूप पैसा होता, तरीही प्रॉडक्शन हाऊससाठी त्याला पत्नीच्या सहीची गरज होती. त्यानंतर त्यांनी आपापसात सेटलमेंट करायचं ठरवलं. मग अभिनेत्रीचं नाव सर्व कायदेशीर कागदपत्रांमधून काढलं. आता ते प्रॉडक्शन हाऊस तो अभिनेताच चालवतो आणि ते दोघे अजूनही एकत्र राहत आहे.’ असंही बलदेव म्हणाले.

Maharashtra TimesSuresh Oberoi : ‘मित्राच्या सांगण्यावरून मी भाजपमध्ये प्रवेश केलेला, राजकारणात खोटेपणा जाणवत होता’, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं वक्तव्य
बलदेव यांनी सांगितलं की, अभिनेता आणि अभिनेत्री एकमेकांची सतत फसवणूक करायचे. ‘तो अभिनेता इतरांकडून फेव्हर घ्यायचा आणि इतरांना फेव्हर द्यायचा. फेव्हर म्हणजे शारीरिक संबंध. एवढंच नव्हे तर त्या अभिनेत्रीचेही इतरांसोबत संबंध होते. तिच्या नवऱ्यालाही याबद्दल माहित होतं. या जोडप्याचे आठ हाय-प्रोफाईल मित्र होते आणि अभिनेत्रीचे यापैकी तीन जणांसोबत संबंध होते. पती परदेशातही फेव्हर घ्यायचा. हे पत्नीलाही माहीत होतं. आम्ही तिला त्याचा पुरावाही दिला आहे. हे प्रकरण करोनानंतरचं असून या जोडप्याला मोठी मुलं आहेत.’ असं बलदेव शेवटी म्हणाले.