Headlines

ISKCON President Dr Surdas on Ajit Pawar Accident underlines Shrimad Bhagavat importance; श्रीमद्भगवद्गीता वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाही, ‘इस्कॉन’च्या डॉ सूरदास यांचा दावा, अजित पवारांनाही पुस्तक दिलेलं, त्यांनी वाचलं असावं


Iskcon Leader Surdas Claims About Ajit Pawar : “मी स्वतः अजित पवार यांना गेल्या आषाढी एकादशीला हे पुस्तक भेट दिले होते. त्यांना ते वाचण्याची विनंती केली होती; त्यांनी ते नक्कीच वाचले असेल याची मला पूर्ण खात्री आहे, तरीही त्यानंतर जे काही घडले ते दुर्दैवी होते” असं डॉक्टर सूरदास म्हणाले.

Dr Surdas Ajit Pawar Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : श्रीमद्भगवद्गीता वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाही, असा दावा इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉक्टर सूरदास यांनी केला आहे. महाराष्ट्राचे दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही मी हा ग्रंथ वाचायला दिला होता, त्यांनी ते वाचलं असेल अशी मला खात्री आहे, असं वक्तव्य डॉक्टर सूरदास यांनी केलं. अजित पवारांसोबत जे घडलं, ती अत्यंत दुर्दैवी घटना होती, असंही डॉक्टर सूरदास म्हणाले.

डॉ सूरदास काय म्हणाले?

“मी स्वतः अजित पवार यांना गेल्या आषाढी एकादशीला हे पुस्तक भेट दिले होते. त्यांना ते वाचण्याची विनंती केली होती; त्यांनी ते नक्कीच वाचले असेल याची मला पूर्ण खात्री आहे, तरीही त्यानंतर जे काही घडले ते दुर्दैवी होते” असं डॉक्टर सूरदास म्हणाले.

“जे काही घडले, ते चांगले नाही झाले. मी अजित पवार यांच्या कक्षात जाऊन भगवद्गीता त्यांना भेट दिली होती आणि मी एकच गोष्ट त्यांना वारंवार सांगत होतो. कदाचित तुम्हालाही तो दिवस आठवत असेल; त्यांच्या कक्षात अनेक पत्रकारही उपस्थित होते. मी त्यांना म्हणालो, “कृपया हे वाचा; आपण हे वाचलेच पाहिजे. याकडे केवळ एक सामान्य पुस्तक म्हणून पाहू नका.” असं डॉ. सूरदास म्हणाले.

Maharashtra TimesPune Crime : सायकलवरुन जाणारा कोण आहे? CCTV पाहून पोलिसांचा सवाल; साहेब हा तर मीच आहे, आरोपीचं उत्तर, पुण्यातील चिमुकलीवर अत्याचार करणारा अलगद सापडला“मी तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो, जो कोणी हे ‘व्रत’ पूर्णपणे वाचेल आणि आपल्या जीवनात आचरणात आणेल, त्याचा अकाली मृत्यू होणार नाही” असा दावाही डॉ सूरदास यांनी केला.

अजित पवार यांचे अपघाती निधन

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी एका भीषण विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना त्यांच्या विमानाला अपघात झाला होता. विमान मुंबईहून बारामतीच्या दिशेने जात होते. लँडिंगच्या वेळी दृश्यमानता कमी असल्यामुळे आणि तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळल्याची माहिती समोर आली. कोसळल्यानंतर विमानाने लगेच पेट घेतला.

Maharashtra TimesNashik Crime : नाशिकमधील 34 वर्षीय विवाहितेच्या मृत्यू प्रकरणाला वळण, दोन वर्षांचे प्रेमसंबंध, रिसॉर्टवर 43 वर्षीय प्रियकराने जीव घेतलाया अपघातात ६६ वर्षीय अजित पवार यांच्यासह विमानातील कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक विदिप जाधव आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी अशा एकूण पाच जणांचा मृत्यू झाला होता.