Headlines

19 year old suraj ends life under medical exam stress emotional note shocks everyone; काळजी घ्या अन् तुम्ही आनंदी राहा; १९ वर्षीय सूरजची शेवटची चिठ्ठी, तरण्याबांड पोराच्या मृत्यूने शिंदे कुटुंब कोसळले


सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या अभ्यासाच्या ताणतणावातून एका १९ वर्षीय होतकरू विद्यार्थ्याने स्वतःचे आयुष्य संपवल्याची मन हेलावून टाकणारी घटना वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे उघडकीस आली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने पालकांसाठी लिहिलेली भावुक सुसाईड नोट पोलिसांना सापडली असून, यामुळे संपूर्ण वैजापूर तालुक्यात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सूरज सुभाष शिंदे (वय १९) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, गावात हरिनाम सप्ताह सुरू असल्याने घटनेच्या वेळी घरातील सर्व सदस्य सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांनी सूरजला फोन केला; मात्र त्याचा मोबाईल बंद येत होता. संशय आल्याने सुभाष शिंदे यांच्या लहान मुलीने वरच्या खोलीत जाऊन पाहिले असता, सूरज गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.​ तिने मोठ्याने आक्रोश केल्यानंतर खाली उभे असलेले कुटुंब व ग्रामस्थ वरच्या खोलीकडे धावले. त्यांनी तात्काळ सूरजला खाली उतरवून उपचारासाठी वैजापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

“काळजी घ्या अन् आनंदी राहा”

सूरज हा नेहमीप्रमाणे आपल्या घरातील वरच्या खोलीत नीट (NEET) परीक्षेचा अभ्यास करत होता. आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठीत लिहिले होते की, “सॉरी, आई आणि अप्पा… नक्कीच पुढच्या जन्मी तुमच्यासाठी डॉक्टर बनेल. काळजी घ्या आणि आनंदी रहा.”

​डॉक्टर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून रात्रीचा दिवस करणाऱ्या एका निष्पाप तरुणाने असा टोकाचा निर्णय घेतल्याने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर वस्तीवरील शेतात शोकाकुल वातावरणात सूरजवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत