Headlines

आम्ही आज शिंदेंना अपात्र घोषित करु शकतो का? सुप्रीम कोर्टाचा वकील देवदत्त कामत यांना सवाल


शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा आज युक्तिवाद संपला. यानंतर ठाकरेंच्या बाजूने देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. यावेळी न्यायमूर्ती बागची यांनी देवदत्त कामत यांना आम्ही एकनाथ शिंदेंना आज अपात्र करु शकतो का? असा प्रश्न विचारला.

Uddhav Thackeray And Ekath Shinde (1)
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी दिल्ली / मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांचा आज युक्तिवाद संपला. युक्तिवाद संपवत असताना कपिल सिब्बल यांनी धनु्ष्यबाण चिन्ह गोठवलं पाहिजे, अशी मागणी केली. तसेच शिवसेना हा मूळ पक्ष उद्धव ठाकरे यांचाच असल्याचं म्हटलं. एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाण चिन्हाचा फायदा केला, असा दावा सिब्बल यांनी केला. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपल्यानंतर ठाकरे गटाचेच वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद सुरु केला. यावेळी त्यांना न्यायमूर्ती बागची यांनी महत्त्वाचा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी उत्तर दिलं.

देवदत्त कामत यांनी काय युक्तिवाद केला?

“विधानसभा अध्यक्ष चुकले असतील तर कोर्ट आम्हाला दिलासा देऊ शकतं. विधीमंडळ पक्ष कोणत्याही निवडणुकीला उमेदवार उभा करत नाही. विधीमंडळ पक्ष निवडणुकीचा उमेदवार ठरवत नाही तर राजकीय पक्ष ठरवतात. विधीमंडळ पक्षावर सर्व अवलंबून राहण्यासाखं असेल तर इतर पर्यायांचा विचार केला पाहिजे जो केला गेला नाही”, असा युक्तिवाद ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांनी केला.

“आमदारांची टर्म संपली असती तरी आमदार अपात्रता प्रकरण महत्त्वाचं आहे. एकनाथ शिंदे पक्षात राहिले नाहीत तर त्यांच्याकडून होणारे दावे कसे राहतील? बंडखोरी झाली तेव्हा पक्ष कोण होता हे खूप महत्त्वाचं आहे. पक्षाचे प्रमुख, सचिव या रजनेची शिंदेंनी पायमल्ली केली. विधीमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष असल्याचा बचाव करु शकत नाही. अपात्रतेची कारवाई होत असताना विधीमंडळ पक्ष राजकीय पक्ष असल्याचं सांगून कारवाई पासून वाचू शकत नाही”, असा महत्त्वाचा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केला.

न्यायमूर्ती बागचे यांचे देवदत्त कामत यांना अनेक प्रश्न

“आम्ही आज शिदेंना अपात्र घोषित करु शकतो का? आम्ही विधानसभा अध्यक्षांची भूमिका घेऊन शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का?”, असा प्रश्न न्यायमूर्ती बागची यांनी देवदत्त कामत यांना विचारला. “आम्ही शिस्तभंगाच्या कारवाईची शिक्षा रद्द करु शकतो. पण शिक्षा देऊ शकतो का?” असा प्रश्न देखील न्यायमूर्ती बागची यांनी देवदत्त काम यांना विचारला. “अध्यक्षांची भूमिका ही कायद्याच्या विरोधात असेल तर आम्ही ती रद्द करु शकतो. यात आम्हाला शंका नाही. पण परिणामी आम्ही त्यांना अपात्र करु शकतो का?”, असे न्यायमूर्ती बागची यांनी कामत यांना विचारले.

“निर्णय घेण्यासाठी आम्ही प्रकरण प्राधिकरणाकडे परत पाठवू शकतो”, असं न्यायमूर्ती बागची म्हणाल्या. “एकनाथ शिंदे यांच्याकडे विधानसभेत बहुमत होतं यात काही वाद नाही. पण मुख्य प्रश्न हा आहे की, जेव्हा त्यांनी विधानसभेत बहुमत मिळवलं तेव्हा ते पक्षाचे सदस्य राहिले होते का?”, असा प्रश्न न्यायमूर्ती कामत यांना विचारला.

देवदत्त काम यांनी काय उत्तर दिलं?

“ज्या पद्धतीने सरकार तयार झालं त्यानंतर प्रतित्रापत्र दाखल केलं. 10 व्या सुचीनुसार सर्व घडलं की नाही हे पाहणं अध्यक्षांचं काम होतं. समोरच्या बाजूला उत्तर देण्याची संधी दिली ती कशी दिली. एकनाथ शिंदेंना उत्तर देण्याची संधी दिली म्हणजे अध्यक्ष त्यांना सिस्टीम मानायला लागले होते का?”, असा सवाल देवदत्त कामत यांनी कपिल सिब्बल यांना केला.

“उद्धव ठाकरे यांची 2013 मध्ये पक्षप्रमुख म्हणून निवड झाली. त्यानंतर 2014 मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या त्यांच्या नेतृत्वातच निवडल्या गेल्या. त्यानंतर 2018 मध्ये संघटनात्मक निवडणूक झाली आणि ठाकरे पक्षप्रमुख झाले”, असा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केला.

“एकनाथ शिंदे धनु्ष्यबाण चिन्हावर निवडून आले जे त्यांना ठाकरेंनी दिलं. आता ते बोलतात मीच राष्ट्रीय पक्ष. तसेच 2019 साली ठाकरेंच्या नेतृत्वात निवडणुका झाल्या. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांनी उचलेली पावलं चुकीची होती. बंडखोर गट निर्णय घेऊ शकतो. मात्र त्याला कायदेशीर पद्धत असते. पण बंडखोर गटाने चुका करुन पक्षावर ताबा घेण्याचा प्रयत्न केला”, असा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केला.

शिंदेंच्या चुकाच चुका, कामत यांचा युक्तिवाद

“सगळीकडे 2018 च्या पक्ष घटनेचा अवलंब केला. आम्ही दिलीप लांडे यांना विचारलं, त्यांनी सांगितलं हीच घटना बरोबर आहे. योगेश कदम हे देखील म्हणाले की, संविधान सबमिट करणं वकिलांची चूक होती. एकनाथ शिंदेंनी निवडणूक आयोगापुढे, कोर्टात आणि विधानसभा अध्यक्षांकडे चुकाच चुका आहेत. राजकीय पक्षाच्या विरोधात जाऊन शिंदे मुख्यमंत्री झाले”, असादेखील युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केला.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा