Headlines

Donald Trump: अमेरिकेतही हवीत मतदार ओळखपत्रे; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतीय निवडणूक पद्धतीवर स्तुतिसुमने


Donald Trump On Indian Election System: आपल्याकडेही मतदारांना ओळखपत्र द्यायला हवे. त्यासाठी ‘द सेव्ह अमेरिका ॲक्ट’ आता मंजूर व्हायला हवा’, असे ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

Anderson Phillip Catch - 2026-08-19T094834
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
वृत्तसंस्था, वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय निवडणूक पद्धतीवर स्तुतिसुमने उधळली आहेत. ‘भारतात दोन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत तब्बल ६४ कोटी ६० लाख मतदारांनी मतदान केले. त्यातील प्रत्येकाकडे मतदार ओळखपत्र होते. अमेरिकेतही ही पद्धत लागू करायला हवी’, असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले. निमित्त आहे ‘सेव्ह अमेरिका’ कायद्याला मंजुरी मिळण्याचे.

अमेरिकी निवडणूक पद्धतीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ‘सेफगार्ड अमेरिकन व्होटर एलिजिबिलिटी (सेव्ह) अमेरिका ॲक्ट’ या कायद्यासाठी ट्रम्प प्रशासन आग्रही आहे. मात्र, डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन यांच्यात या कायद्यातील तरतुदींवरून मतभेद निर्माण होऊन अमेरिकी सिनेटचे कामकाज पाच आठवड्यांसाठी संस्थगित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या समाज माध्यमावर भारतीय निवडणूक पद्धती विषयी त्यांचे मत व्यक्त केले आहे.

Maharashtra Timesमुंबईच्या 2 डॉक्टरांना पाकिस्तानचा सर्वोच्च सन्मान; जिन्नांचं गुपित लपवणारे ‘ते’ दोघे नेमके कोण?‘प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी अलीकडेच भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्याशी संवाद साधला. या चर्चेदरम्यान ज्ञानेशकुमार यांनी मतदार ओळखपत्र नसतानाही तुम्ही निवडणुका कशा घेऊ शकता, असा प्रश्न उपस्थित केला.

सेव्ह अमेरिका कायद्याचा सविस्तर तपशील व्हाइट हाऊसच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. भारत आणि ब्राझील या दोन देशांमध्ये मतदारांना ओळखपत्र देण्यात आले असून, त्यांचा बायोमेट्रिक डेटा संकलित करण्यात आला असल्याचे त्यात नमूद आहे. अमेरिकेत मतदान करतेवेळी मतदाराला केवळ स्वसाक्षांकित कागदपत्रे सादर करावी लागतात.

Maharashtra Timesगटार खणण्याचं काम सुरू असताना मजुरांच्या हाती घबाड; सोन्याची बिस्किटं, नाणी पाहून डोळे विस्फारले‘ज्ञानेशकुमार यांना अमेरिकेत घेऊन जा’

ट्रम्प यांच्या स्तुतिसुमनांनंतर काँग्रेसने ज्ञानेशकुमार यांना अमेरिकेत घेऊन जाण्याचा सल्ला त्यांना दिला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी ‘एक्स’वर पोस्ट लिहित हा सल्ला दिला. ‘आम्ही आमच्याकडची मतदान यंत्रेही त्यांच्यासोबत पाठवून देऊ’, असेही खेरा यांनी नमूद केले आहे.

सेव्ह अमेरिका अॅक्टमध्ये काय ?
-या प्रस्तावित कायद्यात मतदान करतेवेळी अमेरिकी मतदारांना त्यांच्या नागरिकत्वाचा पुरावा द्यावा लागेल
-मतदारांना ओळखपत्र देण्यासाठी देशव्यापी मोहीम चालवली जाणार
-पोस्टाद्वारे मतदान करण्याच्या पद्धतीवर आत्यंतिक मर्यादा आणल्या जाणार

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा